एकीकडे स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या म्हणून मागणी केली जात आहे आणि दुसरीकडे सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसचे हात बळकट करण्याचे काम उद्धव ठाकरे आणि त्याचे चिरंजिव आदित्य ठाकरे करत आहे. हा केवळ महाराष्ट्राचा नाही तर देशाचा अपमान असल्याचे मत भारतीय जनता पक्षच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>‘आश्रमशाळा टू अमेरिका’; गडचिरोलीच्या भास्करचा प्रेरणादायी प्रवास; आदिवासी समाजातील व्यक्तीची वैज्ञानिकपदी निवड

काँग्रेसची भारत जोडो यात्रा दरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोधर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले. त्याच्य निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चा आणि महिला आघाडीच्यावतीने टिळक पुतळात चौकात प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत राहुल गांधी यांचा पुतळा जाळण्यात आला. यावेळी राहुल गांधी आणि काँग्रेसच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

हेही वाचा >>>वर्धा: सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी आशा बोथरा

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान हा देशाचा अपमान आहे. सावरकरांच्या बद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्यासोबत बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार कसे फिरु शकतात असा प्रश्न महाष्ट्रात विचारला जात आहे. कोणी जन्माने वारसदार होत नाही विचाराने होत असतात. ज्याच्या विचाराने जाजवल्य इतिहास उजळला त्यांची अवहेलना करण्याची काँग्रेसचे हिंमत होतेच कशी असा प्रश्न वाघ उपस्थित केला. यावरुन शिवसेनेचे बेगडी हिंदुत्व दिसून येत असल्याची टीका वाघ यांनी केली.यावेळी अर्चना डेहनकर, शिवाणी दाणी, नीता ठाकरे, पारेंद्र पटले. सचिन कराळे. दिपांशु लिंगायत. अमोल तिडके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chitra vagh asked the heirs of balasaheb walking with those who insulted savarkar aditya and uddhav thackeray amy