गोंदिया: नाना पटोले हा लफडेबाज माणूस आहे. या लफडेबाज माणसाला लाज वाटली पाहिजे तो अकोला येथे जाऊन आमचे खासदार संजय धोत्रे यांचा मृत्यू झाला पाहिजे म्हणतो. इतक्या खालच्या पातळीची वाईट मानसिकता या लफडेबाज नानाची आहे. या खालच्या पातळीच्या कृतीबद्दल खा.संजय धोत्रे आणि अकोलेकर जनतेची माफी मागितली पाहिजे, असा घणाघात गोंदिया-भंडारा लोकसभाच्या भाजप निरीक्षक चित्रा वाघ यांनी गोंदियात माध्यमांशी संवाद साधताना केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुढे एका प्रश्नाच्या उत्तरात त्या म्हणाल्या, संजय राऊत हा आर्थिक लुबाडणुकीच्या गुन्ह्यात सध्या जामिनावर सुटलेला माणूस आहे. अशा १०३ दिवस कारागृहात असलेल्या माणसाला गांभिर्याने घेण्याची गरज मला तरी वाटत नाही. लोकसभा निवडणुकी नंतर त्याची जागा परत कारागृहातच असणार आहे. अबकी बार ४०० पार झाले तर भाजप संविधान बदलणार अस आरोप विरोधक करतात यावर बोलताना वाघ म्हणाल्या की पंतप्रधान मोदींनी या सर्वांची खाऊ खाऊ बंद केली आहे.

हेही वाचा…इंडिया आघाडी म्हणजे तुटलेले इंजिन, देवेंद्र फडणवीसांनी उडवली खिल्ली…..

विरोधकांना भ्रष्टाचाराची सवय झाली आहे. हे कितीतरी वेळा आत बाहेर झालेले आहेत. तो मद्य घोटाळ्यातील अरविंद केजरीवाल, तो चारा घोटाळ्यातील लालू यादव,तो जमीन घोटाळ्यातील हेमंत सोरेन, प.बंगाल संदेशखाली घटनेची संशयाची सुई असलेली ममता बॅनर्जी हे सगळी घोटाळेबाज मंडळी मोदींच्या ना खाऊंगा ना खाने दुंगा या धोरणाने त्रस्त झालेले आहेत.म्हणून यांना पुन्हा मोदी नको आहेत. पण या देशातील बहुतांश जनता मोदींच्या पाठीशी आहे.येत्या ४ जूनला या सगळ्यांना चारही मुंड्या चीत केल्याशिवाय मोदी राहणार नाहीत, असा मला विश्वास असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या.या प्रसंगी त्यांच्या सोबत खासदार पत्नी शुभांगी मेंढे, माजी नगर सेविका मैथिली पुरोहित, निर्मला मिश्रा , मैठुला बिसेन उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chitra wagh criticise nana patole over his controversial statement on mp sanjay dhotre sar 75 psg
Show comments