गोंदिया : संजय राऊत हे १०३ दिवस जेलमध्ये राहून आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे आणि त्या मानसिकतेतून ते बोलत असतात. महाराष्ट्रातील आमचे सरकार हे फेसबुक लाईव्हचे सरकार नसून लोकांच्या दारी जाऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणणारे सरकार आहे, असे म्हणत चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांनाही टोला लगावला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वातंत्र्याची ७५ वर्षे भारतीय संस्कृतीचा आणि कर्तृत्वाचा स्मरण करण्यासाठी ‘मेरी माटी मेरा देश’ हा उपक्रम भारत सरकार राबवित असून गोंदिया शहरातदेखील भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या उपस्थित गोंदियात लोकांच्या दारावर जाऊन ‘मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमासाठी माती संकलन करण्यात आली. या प्रसंगी त्या माध्यमांशी बोलत होत्या.

हेही वाचा – वैनगंगा नदीने ओलांडली धोका पातळी, भंडाऱ्यात पूर परिस्थिती

उद्धव ठाकरे यांना आपण विदूषकचे कपडे पाठविले होते. हा प्रश्न चित्रा वाघ यांना विचारले असता आमच्या नेत्यांवर वैयक्तिक टीका कराल तर, अभी तो पिक्चर बहोत बाकी है, असे म्हणत भाजपा महीला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी ठाकरे गटाला सूचक इशारा दिला आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूरच्या सभेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरीरावरून टीका केली होती. त्यानंतर चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांना विदूषकचे कपडे पाठविले होते. एखाद्या नेत्याच्या शरीरयष्टीवरून टीका करणे हे उद्धव ठाकरे यांना शोभत नाही. उद्धव ठाकरे हे आमच्या नेत्यांच्या टीवल्या-बावल्या करतात आणि लोकांना हसवतात आणि हसवण्याचे काम हे विदूषक करतात. म्हणून उद्धव ठाकरे यांना विदूषकचे कपडे आम्ही पाठवले, असे चित्र वाघ म्हणाल्या.

हेही वाचा – भंडारा : भरधाव चारचाकीने तिघांना चिरडले, सैन्य अधिकाऱ्यासह तीनजणांचा मृत्यू

अडीच वर्षांत तुम्ही काय केलं त्याचे उत्तर द्या

या राज्यावर ४० वर्षं मराठी नेते राज्य करत होते. त्यावेळी कुणी मराठ्यांना आरक्षण दिलं नाही. मराठ्यांना आरक्षण मिळायला हवा ही सरकारची भूमिका आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केली. त्या अडीच वर्षांत उच्च न्यायालयात हे आरक्षण टिकवू शकलेले नाहीत, असेही चित्रा वाघ म्हणाल्या.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chitra wagh criticized sanjay raut in gondia said sanjay raut going to jail has affected his head sar 75 ssb