पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री संजय राठोड यांच्याविरोधात आपला न्यायालयीन लढा सुरूच ठेवणार असल्याचे भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी येथे स्पष्ट केले. सध्या विदर्भ दौऱ्यावर असलेल्या चित्रा वाघ महिला मेळाव्यानिमित्त गडचिरोलीत आल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यापूर्वी यवतमाळ येथे संजय राठोड यांच्याबाबत एका ज्येष्ठ पत्रकाराने प्रश्न विचारताच चित्रा वाघ आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले होते. यावरून मोठा वादही झाला. याचे पडसाद वर्धा जिल्ह्यातही उमटले. तेथील पत्रकारांनी वाघ यांच्या पत्रपरिषदेवर बहिष्कार टाकला. आज गडचिरोलीतील पत्रकार परिषदेत याबाबतच्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले. आपण संजय राठोड प्रकरणी अजूनही ठाम असून हे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे, यापुढेही ही न्यायालयीन लढाई लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Maharashtra Kesari 2025 result Shivraj Rakshe prithviraj mohol Controversy
Maharashtra Kesari : एवढं ‘मोहोळ’ का उठलंय? राष्ट्रवादीच्या नेत्याचा कुस्तीत राजकारण शिरल्याचा आरोप; म्हणाले, “खरा जिंकला तो…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
Shivsena MLA Arjun Khotkar
Arjun Khotkar : “राजकीय भूकंप काय असतो हे आम्ही दाखवून देऊ”, अर्जुन खोतकरांचं मोठं विधान; कोणाला दिला इशारा?
loksatta article mahatma Gandhi assassination opposition is left to criticize rss
महात्मा गांधी केवळ संघविरोधासाठीच उरले आहेत?
Chhatrapati sambhajinagar loksatta news
सिल्लोड भाजप शहराध्यक्षांसह तिघांविरुद्धचा गुन्हा रद्द, माजीमंत्री अब्दुल सत्तारांविरुद्धचे वक्तव्य प्रकरण
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
lokmanas
लोकमानस: लोकशाही की एकाधिकारशाही?

हेही वाचा- नागपूर : ‘घनकचरा व्यवस्थापनाचा देशातील पहिला नाविन्यपूर्ण प्रकल्प नागपुरात’; देवेंद्र फडणवीसांची घोषणा

आदिवासी महिलेवरील अत्याचार प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

महिनाभरापूर्वी एटापल्ली तालुक्यातील येलचील परिसरात एका आदिवासी महिलेवर ट्रक चालकाने केलेला बलात्कार दुर्दैवी असून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही चित्रा वाघ यांनी दिली. सोबतच पीडित महिलेला शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. एटापल्ली तालुक्यातील सुरजागड टेकडीवर लोहखनिजाचे उत्खनन सुरू झाल्यापासून त्या परिसरात गुन्ह्याचे प्रमाण वाढले आहे. अशातच २९ सप्टेंबरला एका आदिवासी महिलेवर ट्रक चालकाने बलात्कार केला. संबंधित ट्रक सूरजागड लोहखानिशी निगडित असल्याने प्रशासनाकडून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची त्यावेळी चर्चा होती. मात्र, माध्यमांनी प्रकरण लावून धरल्याने पोलिसांनी तडकाफडकी कारवाई करत दोषी ट्रक चालकाला अटक केली. मात्र, यासंदर्भात माहिती देण्यास ते तयार नव्हते. याबाबत चित्रा वाघ यांना प्रश्न केल्यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

हेही वाचा- नागपूर : ‘पोलीस भरतीसाठी सर्व जिल्ह्यांमध्ये अर्ज भरण्याची संधी द्या’; युवक-युवतींचे धरणे आंदोलन

महिला अत्याचारासंदर्भात राज्यातील सरकार प्रभावी उपाययोजना करीत असून असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही. याविषयी सखोल माहिती घेऊन प्रकरण दडपणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोबतच पीडित महिलेला शासनाच्या मनोधैर्य योजनेतून व भाजप महिला मोर्चाकडून शक्य ती मदत केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील विविध प्रश्नदेखील समजून घेतले.

Story img Loader