संविधान चौकात पोलिसांच्या मदतीला नागरिक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संविधान चौकात वाहतूक पोलीस शिपायाला मारहाण होत असताना नागरिक पोलिसाच्या मदतीला धावले व मारहाण करणाऱ्यास चांगलाच चोप दिला. शेवटी पोलिसाला मारहाण करणाऱ्यालाच रुग्णालयात दाखल करावे लागले. ही घटना आज  मंगळवारी घडली.

मोहम्मद मोबिन अन्सारी (२९) रा. सैफीनगर, मोमिनपुरा असे आरोपीचे नाव आहे. हवालदार नीलेश दिगंबर चौधरी (५१) असे फिर्यादीचे नाव असून सध्या ते सीताबर्डी वाहतूक झोनमध्ये कार्यरत आहेत. मंगळवारी दुपारी ते आपल्या सहकाऱ्यासह संविधान चौकात सेवा देत होते. त्यावेळी आरोपी हा नवीन मोपेड घेऊ न आला. त्याच्या डोक्यात हेल्मेट नसल्याने त्याला पोलिसांनी थांबवले. पोलिसांनी हेल्मेट न घालण्यासह वाहनाच्या दस्तऐवजाबाबत विचारणा केली. त्यामुळे मोबिन संतापला. त्याने नीलेश यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. ते खाली पडले व जखमी झाले. मोबिन पळू लागताच परिसरातील नागरिकांनी त्याला पकडले व चोप दिला. माहिती मिळताच सदर पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी नागरिकांच्या तावडीतून मोबिन याची सुटका केली. नागरिकांनी बदडल्याने मोबिनही जखमी झाला. पोलिसांनी त्याला मेडिकलमध्ये दाखल केले. याप्रकरणी सदर पोलिसांनी मोबिनविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा गुन्हा दाखल केला.