नागपूर : विंग कमांडर विनित विजय मारवाडकर यांना प्रजासत्ताक दिनी प्रतिष्ठित राष्ट्रपती पुरस्कार, युद्ध सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले. मारवाडकर हे महाल, नागपूर येथील रहिवासी आहेत. त्यांनी हडस हायस्कूलमधून शालेय शिक्षण, धरमपेठ विज्ञान महाविद्यालयातून पदवी आणि प्रादेशिक कामगार संस्था नागपूरमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. पदव्युत्तर शिक्षणानंतर, ते २००३ मध्ये भारतीय हवाई दलात प्रशासकीय शाखेत रुजू झाले. ते सध्या हवाई दलाच्या आघाडीच्या तळावर तैनात आहेत.
हेही वाचा…दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोगामुळे १ अब्ज नागरिक प्रभावित, ‘हे’ आहे कारण…
युद्धकाळातील विशिष्ट सेवेसाठी युद्ध सेवा पदक प्रदान केले जाते. हे उच्च दर्जाच्या प्रतिष्ठित सेवेसाठी दिले जाते, ज्यामध्ये युद्ध, संघर्ष किंवा शत्रुत्वाचा समावेश असतो आणि मरणोत्तर सुद्धा हे पुरस्कार दिला जाऊ शकतो.