चंद्रपूर: महापालिकेने अमृत २ व भूमिगत गटार योजनेच्या नावाखाली संपूर्ण चंद्रपूर शहरातील मुख्य रस्ते खोदून ठेवले आहे. मुख्य रस्त्यांसोबत वॉर्डावॉर्डातील रस्त्यांची दैनांवस्था करून ठेवली आहे. रस्त्यात खड्डे नाही तर, खड्ड्यात रस्ते अशी अवस्था चंद्रपूर शहराची महापालिकेने करून ठेवली आहे. अरूंद रस्त्यामुळे अपघात वाढले असून मुख्य रस्त्यावर वाहनाच्या रांगा लागू लागल्या आहेत. मात्र, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना यांचे काहीएक साेयर सुतक दिसत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहरातील प्रत्येक नागरिकांना नळाव्दारे पिण्याचे पाणी मिळावे यासाठी केंद्र शासनाने अमृत योजना आणली. या योजनेतंर्गत  चंद्रपूर महानगरपालिकेसाठी २०१७  मध्ये तब्बल २३४ कोटींची अमृत योजना मंजूर झाली. याचे कंत्राट नांदेड येथील कंत्राटदार संतोष मुरकुटे यांच्या कंपनीला मिळाले. नियोजनाच्या आर्थिक गणिताप्रमाणे सर्वांची टक्केवारी ठरली आणि शहर खोदायला सुरुवात झाली. भूमिगत पाईपलाईन टाकण्याच्या नावावर बघता बघता संपूर्ण शहर खोदून काढण्यात आले. जिथे मनात आले तिथे खड्डे खोदण्यात आले. मात्र त्यानंतर त्याची दुरुस्ती करून ते सुव्यव्यवस्थित आणण्याच्या भानगडीत कंत्राटदार पडला नाही. काही ठिकाणी थातूरमाथूर मुरूम टाकण्यात आले.

हेही वाचा >>>शिक्षणाव्दारे पर्यावरण संवर्धन: राज्यपाल काय म्हणाले…

अमृत १ चे काम झाले मात्र, चंद्रपूर शहरातील नागरिकांना पाण्याचा एक घोटसुध्दा मिळाला नाही. ही  योजना पूर्णत्वास आल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी अमृत २ च्या कामाला सुरूवात केली आहे. या कामासाठी करोडो रूपये खर्च करण्यात येणार आहे. यासाठी चंद्रपूर शहरातील सुव्यस्थित व रहदारीसाठी योग्य असलेले मुख्य रस्ते खोदून ठेवले आहे. रस्त्यांच्या मधोमध खड्डे खोदण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण रस्ता हा अरूंद झाला आहे. लोकांचा जाण्याचा मार्ग, त्यांना होणारी अडचण, वाहतुकीची कोंडी याकडे महापालिका प्रशासन सपशेल दुर्लक्ष करीत आहे. सध्या जटपुरा गेट समोर रस्ता खोदण्याचे काम सुरू आहे. यामुळे वाहनांच्या रांगाच रांगा लागत आहे. कित्येक तास वाहनाच्या मोठ-मोठ्या रांगा लागल्या असतात. त्यामुळे कामावर जाणाऱ्या व ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही लोक खड्ड्यात पडत आहेत.  नागरिकांकडून पालिका प्रशासनावर रोष व्यक्त केला जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Citizens are suffering due to excavation work on the roads of chandrapur city rsj 74 amy