लोकसत्ता टीम

नागपूर : भारतातील सर्वात जास्त शिक्षित व्यक्ती म्हणून ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद असणारी व्यक्ती म्हणजे दिवंगत डॉ. श्रीकांत जिचकार. त्यांनी ४० पेक्षा जास्त विद्यापिठांमधून २० पदव्या प्राप्त केल्या आहेत. एवढेच नाही तर शैक्षणिक गुणवत्तेकरिता २८ सुवर्णपदके जिंकली. नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करणारे हे व्यक्तीमत्त्व शिक्षणतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ तर होतेच, पण राजकारणातही ते होते. अशा या व्यक्तीमत्त्वाचा वयाच्या अवघ्या ५१व्या वर्षी अपघाती मृत्यू झाला आणि नागपूरच नव्हे तर देशही स्तब्ध झाला.

आणखी वाचा-शासकीय मेडिकल रुग्णालयामधील अमृत महोत्सव सोहळा पुन्हा वादात!

त्यांच्या जयंतीनिमित्त अडोर ट्रस्टच्‍या डायबेटीक रिव्‍हर्सल कौन्सिलिंग सेंटर नागपूरच्‍या वतीने रविवार १० सप्टेंबरला वॉक मॅरेथॉनचे आयोजन करण्‍यात आले. एकाच वेळी १४ देश आणि देशातील विविध राज्‍यातील लोक या वॉक मॅरेथॉनमध्‍ये सहभागी होणार असून विश्वविक्रम प्रस्‍थापित करण्‍याचा प्रयत्‍न केला जाणार आहे. नागपूर शहरात विविध १५ ठिकाणी सकाळी सहा ते नऊ या वेळेत पाच किलोमीटरचे वॉक मॅरेथॉन झाले.

Story img Loader