गोंदिया : नवेगाव-नागझिऱ्यातील जंगलात गेल्या काळात क्षेत्र अस्तित्वासाठी झालेला वाघांचा थरार गोंदिया जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील नागरिकांनी अनुभवला. आता वन्यजीव प्रेमींसाठी नागझिऱ्यातून आनंदाची बातमी आली आहे. गेल्या दीड वर्षांपूर्वी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आलेल्या एनटी-२ वाघिणीने तीन छाव्यांना जन्म दिला असून आपल्या आईसह रानगव्याच्या शिकारी नंतरच्या हालचाली कॅमेर्यात कैद झाल्या आहेत.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र संवर्धनासाठी वन विभागाने वाघाचे संवर्धन, स्थानांतरण, उपक्रमामध्ये आता पर्यंत एकूण ३ वाघिणी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये स्थानांतरित केल्या. पहिल्या टप्प्यामध्ये एनटी-१ व एनटी-२ ह्या वाघिणीला २० मे २०२३ रोजी तर दुसऱ्या टप्प्यामध्ये एनटी-३ या वाघिणीला ११ एप्रिल २०२४ ला नागझिरा वन्यजीव अभयारण्यात सोडण्यात आले होते. त्यामध्ये एनटी-२ वाघिणीने नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रामध्ये सहजपणे आपली जागा निर्माण केली आणि आता सद्य स्थितीमध्ये ट्रॅप कॅमेराद्वारा एनटी-२ वाघिणीच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. सदर ट्रॅप कॅमेरामध्ये एनटी-२ वाघिणीचे प्रथमतःच तिच्या ३ छाव्यां सोबत रानगव्याची शिकार करतानाच्या हालचाली टिपण्यात आल्या.
हेही वाचा…शिक्षकांसाठी मोठी बातमी! वेतनात २० टक्के वाढ होणार?
सद्या निसर्गमुक्त केलेल्या ३ वाघिणींपैकी २ वाघिणीने नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात (गाभा व बफर) आपला अधिवास निर्माण केला आहे. तेव्हा एनटी-२ वाघिणींच्या पिलांमुळे प्रकल्पाच्या उद्दिष्टांना यश प्राप्त झाले आहे.एनटी-२ वाघिणीच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवण्यासाठी व्हीएचएफ /जीपीएस कॉलर आणि कॅमेरा ट्रॅप यासारखी आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि यंत्रसाधने वापरण्यात आली होती. ज्यामध्ये कमांड आणि कंट्रोल रूम चा महत्वाचा वाटा आहे.
हेही वाचा…‘मंदिरावर हल्ला झाला’! ‘त्या’ क्रमांकावर संदेश आल्याने पोलिसांची धावपळ, प्रत्यक्षात…
प्रकल्पाच्या उद्दिष्टांना मिळाले नवे यश…
एनटी-२ वाघिणीच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवण्यासाठी कॉलर आणि कॅमेरा ट्रॅप यासारखी आधुनिक साधने वापरण्यात आली होती. दरम्यान,एनटी-२ वाघीनीच्या पिलांच्या जन्मामुळे प्रकल्पाच्या उद्दिष्टांना नवे यश व दिशा प्राप्त झाली आहे. पवन जेफ, उपसंचालक, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प राखीव क्षेत्र, साकोली