हिंगणा तालुक्यातील मोहगाव झिलपी गावातील नागरिकांनी सर्वसहमतीने निर्णय घेत ग्रामपंचायतीसाठी निवडणूक न घेता सर्व सदस्यांची बिनविरोध निवड केली. जिल्ह्यात ग्राम पंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. अनेक गावात मोठ्या संख्येने उमेदवार रिंगणात आहेत. मात्र मोहगाव झिल्पीतील गावकऱ्यांनी निवडणुकीत होणारा खर्च टाळण्यासाठी सर्व सहमतीने निवडणूक टाळण्याचा निर्णय घेतला.

एका पदासाठी एकाच उमेदवाराने उमेदवारी अर्ज सादर केला. सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष राष्ट्रवादी-काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून प्रयत्न केले. विद्यमान सरपंच प्रमोद डाखले यांचा सरपंच पदासाठी तर ग्रामपंचायत सदस्य करिता भाजपचे चंद्रशेखर भोंडे, वंदना रंदई,सुवर्णा निघोट,ललिता कैकाडे रवी वाढवे, पवन पाटील तर एका प्रभागातून काँग्रेस-राष्ट्रवादी चे जगदीश नारनवरे शालिनी मानवटकर,सुषमा भरडे यांची नावे गावकऱ्यांनी निश्चितत केली. त्यांच्या विरोधात कुणीही उमेदवारी अर्ज भरला नाही.

हेही वाचा… रावण दहन परंपरेचा विरोध! रावणाच्या मंदिरासाठी मिटकरींनी दिला २० लाखांचा निधी

नामनिर्देशन पत्र छाननी मध्ये कुणाचेही अर्ज बाद झाले नाही. त्यामुळे हे सर्व बिनविरोध निवडले गेले. अनधिकृत घोषणा निकालाच्या दिवशी केली जाणार आहे. मात्र गावकऱ्यांनी आत्ताच आनंदोत्सव साजरा केला.यापूर्वी ३५ वर्षांपूर्वी गावत अशाच प्रकारे ग्रा.प.निवडणूक बिनविरोध झाली होती.

Story img Loader