वाशिम : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भीम अनुयायांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अलोट गर्दी केली होती. नालंदा नगर येथून मोठ्या उत्साहात अभिवादन रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये नागरिकांनी समता आणि शांततेचा संदेश देत जय भीमचा जयघोष दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

१४ ऑक्टोंबर १९५६ रोजी अशोक विजया दशमी दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथील दीक्षाभूमी येथे आपल्या लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. या क्रांतिकारी दिनानिमित्त आज संपूर्ण जिल्ह्यात मुक्ती दिन म्हणून धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यानिमित्त सकाळी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.

हेही वाचा – “लक्षात ठेवा, २०२४ च्या निवडणुकीत मतदान…”; मोहन भागवत यांच्या सूचक वक्तव्याची जोरदार चर्चा

हेही वाचा – बुकी सोंटू जैनच्या पोलीस कोठडीत वाढीने उडवली गोंदियातील अनेकांची झोप, काहींचे शहरातून पलायन

आज सकाळी नालंदा नगर येथे सकाळी नऊ वाजता भंते प्रज्ञापाल थेरो धम्म ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर अभिवादन रॅली काढण्यात आली. यावेळी भंते संघ रक्षीय, भंते नागमार्ग पवण राऊत, डॉ. माधव हिवाळे, अनिल ताजने, दिलीप गवई, पंकज वानखेडे, अमन अवचार, विशाल पडघान, सूरज वाघमारे, धम्मदीप खिल्लारे, महेश तायडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. केवळ वाशीम शहरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.