बुलढाणा : सलग तिन दिवसांच्या गारठ्यानंतर आज, शुक्रवारी शहरासह जिल्ह्यातील थंडीचा कडाका कमी झाल्याने लाखो नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र ग्रामीण भागात धुके मुक्कामीच असल्याने बळीराजाची चिंता कायम आहे. मागील चार-पाच दिवसांपासून  ग्रामीण भागात धुक्याचे साम्राज्य पसरले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हजारो हेक्टरवरील गहू, हरभरा, कांदे या पिकांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी सकाळी व संध्याकाळी पिकांजवळ कुट्टी व पालापाचोळा जाळून पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. वातावरणातील गारठा कमी झाला असला तरी, धुक्याचा मुक्काम कायम आहे. यामुळे लाखो शेतकऱ्यांची चिंता कायम आहे.

हेही वाचा >>> शिक्षक मतदार संघातील निवडणुकीसाठी २४ तास सुरू राहणार नियंत्रण कक्ष

आज, शुक्रवारी तापमान सुसह्य झाल्याने लाखो जिल्हावासीयांनी सुटकेचा श्वास घेतला. बुलढाणा परिसरात आज १५ अंश सेल्सियस इतक्या किमान तापमानाची  नोंद झाली. कमाल तापमान २०.२ अंशावर आहे. मागील तीन दिवसांपासून बुलढाणा परिसराचे किमान तापमान १३ अंशाच्या आसपास रेंगाळले. गुरुवारी तापमानाचा पारा १३.४ तर बुधवारी १३.३ अंशापर्यंत घसरला होता.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Citizens relief fog stay cold but farmers worried nagpur news scm 61 ysh