नागपूर : शहरातील जवळपास ५६ ठिकाणी अनधिकृतरित्या आठवडी बाजार भरतो. पावसाळ्यात रात्री बाजार उठल्यानंतर शिल्लक भाजीपाला, कचरा, मांसाचे तुकडे आणि घाणेरडे पाणी परिसरात फेकून विक्रेते मोकळे होतात. त्यामुळे बाजारात चिखलासह सडलेल्या भाज्यांची दुर्गंधी येते. त्यामुळे बाजार परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
शहरातील अनेक भागांतील आठवडी बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी असते. जवळपास हजारावर विक्रेते कापड टाकून किंवा रस्त्यावरच दुकाने थाटतात. शहरात प्रामुख्याने अजनी-रामेश्वरी भागात सोमवारी, बेसा, बेलतरोडी भागात बेलतरोडी चौकात सोमवारी, महाल व सक्करदरा येथे बुधवारी, राजीवनगरात हॉटेल रॅडिसनसमोर शनिवारी व जयताळा येथे रविवारी आठवडी बाजार भरतो. तेथे ताजी भाजी मिळते त्यामुळे तेथे गर्दी होते. मात्र, बाजार उठताच तेथील शिल्लक कचऱ्याने तसेच सडलेल्या भाजीपाल्याच्या दुर्गंधीने रहिवाशी त्रस्त होतात.
बाजारातील कचऱ्याचे वाढते ढीग, अस्वच्छता, मोकाट जनावरे, डुकरांचा सुळसुळाट, सांडपाण्याचे डबके हे चित्र येथील नित्याचेच झाले आहे. बाजारात प्रसाधनगृहांची सोय नसते. महापालिका फिरत्या स्वच्छता गृहाची सोय करीत नाही. पावसाळ्यात बाजाराची दुरवस्था होते. सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरते. ग्राहकांच्या रस्त्यावरील वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. ऑटोवाले रस्त्यातच थांबतात. त्यामुळे आठवडी बाजारातून मार्ग काढणे अडचणीचे ठरते.
वाहतूक कोंडीची समस्या
ज्या भागात बाजार भरतात तेथे हमखास वाहनकोंडी होते. नागरिकांना वाट काढण्यासाठी आटापिटा करावा लागतो. हाती पिशवी घेऊन रस्त्यावर फिरणाऱ्या ग्राहकांची मोठी गर्दी असते. हॉर्न वाजवूनही ते बाजूला होत नाहीत. यामुळे अनेकदा वाद होताना दिसतात.
महापालिका-वाहतूक पोलीस बघ्याच्या भूमिकेत
बाजारातील कचरा किंवा सडका भाजीपाला उचलण्याचे नियोजन महापालिकेकडून वेळेत होत नाही. तसेच बाजारीतील वाहतूक कोंडी अपघातास कारणीभूत ठरू शकते. तरीही वाहतूक पोलिसांना अजिबात गांभीर्य नाही. ते फक्त बघ्याची भूमिका घेतात.
अधिकृत आठवडी बाजार – १२
अनधिकृत आठवडी बाजार – ५६
बंद झालेले बाजार – ०४
नव्याने रस्त्यावर वाढलेले बाजार – २६
महापालिकेच्यावतीने आठवडी बाजारातील स्वच्छतेसाठी विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातील बऱ्याच ठिकाणी अनधिकृतरित्या बाजार भरतो. अशा ठिकाणी झोनचे उपद्रव शोध पथक कारवाई करते. रस्त्यावर बाजार भरू नये म्हणून महापालिका अनेकदा मोठी कारवाईसुद्धा करीत असते. – सुरेश बगडे, बाजार विभाग, महापालिका
आठवडी बाजाराच्या दिवशी आम्ही दोन पोलीस कर्मचारी तेथे नियुक्त करतो. वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून पोलीस कर्मचारी नियोजन करतात. जर कुणी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करतो. – भारत कऱ्हाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा