हुडहुडी भरण्यासाठी डिसेंबरची प्रतीक्षा
पाऊस आणि थंडी यांच्या नात्याची सांगड घालताना सामान्य नागरिक पाऊस कमी पडला म्हणजे थंडीही पडणार नाही आणि पाऊस खूप पडला तर थंडीही खूप पडणार असेच समीकरण गृहीत धरतो. मात्र, पावसाचे आणि थंडीचे नाते इतके काही घट्ट नाही. सामान्य नागरिकांचे हे समीकरण हवामान अभ्यासकांनी खोडून काढले आहे. यंदा पाऊस कमी पडला तरीही उशिरा सुरू झालेली थंडी उशिरापर्यंत कायम राहणार आणि थंडीचा कडाकाही नागरिकांना अनुभवायला मिळणार, असे संकेत त्यांनी दिले आहेत.

पावसाने पाठ फिरवल्यानंतर थंडी पडणार नाही, असा अंदाज सर्वसामान्यांनी वर्तवला होता. पावसाळयाच्या पहिल्या महिन्याच्या सुरुवातीला अवघ्या तीन दिवसात पावसाने महिनाभराची सरासरी ओलांडली. त्यानंतरही महिन्याच्या पहिल्याच आठवडय़ात पाऊस पडत गेला आणि उर्वरित दिवसात सूर्याने डोके वर काढले. अवघा पावसाळाभर पावसाने सुरुवातीला येऊन उर्वरित महिना गायब राहण्याची परंपरा कायम राहिली.

possibility of cloudy weather in maharashtra due to low pressure area formed in bay of bengal
रविवारपासून पुन्हा ढगाळ वातावरण; जाणून घ्या, थंडीची लाट, कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
nashik municipal corporation taken steps towards making water from borewells available in certain locations
नाशिक शहरात विंधन विहिरींतील पाण्याचा पर्याय; टंचाई निवारणार्थ महापालिकेची व्यवस्था
Mumbaikars await cold weather
थंडी पुन्हा कमी होण्याची शक्यता?
minimum temperatures in north Maharashtra
Maharashtra Weather Update : थंडीत आणखी वाढ होणार ? जाणून घ्या, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रासाठीचा अंदाज
Saket Bridge, Mumbai Nashik Traffic, Road Widening,
मुंबई-नाशिक मार्गावर पुढील तीन महिने कोंडीचे, साकेत पुलाजवळील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणास सुरूवात
Rahu Gochar 2025
Rahu Gochar 2025 : राहु बदलणार चाल, पडणार पैशांचा पाऊस! ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य
mercury in nashik drops 9 4 degrees celsius
नाशिकमध्ये थंडीचे पुनरागमन; पारा ९.४ अंशावर

त्यामुळे पावसाळयातील पाऊस असा झालाच नसल्याने थंडीही यावेळी जास्त राहणार नाही, असेच गृहीत धरले जात होते. मात्र, महिनाभर उशिरा का होईना थंडीची चाहूल लागली. एरवी ऑक्टोबरच्या मध्यान्हात सुरू होणारी थंडी यावेळी नोव्हेंबरच्या मध्यान्हात सुरू झाली आहे.

त्यामुळे जानेवारीच्या पूर्वार्धापर्यंत कायम राहणारी थंडी यावेळी फेब्रुवारीच्या पूर्वार्धापर्यंत कायम राहील, असे हवामान अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले. गेल्या दहा-बारा वर्षांंत प्रथमच असे घडले असून ऋतुचक्र बदलाचा हा परिणाम असल्याचे ते म्हणाले. आधी उन्हाळा, नंतर पावसाळा आणि आता हिवाळासुद्धा उशिरा सुरू झाला. त्यामुळे बदललेले हे चक्र आता असेच कायम राहण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली.
दिवाळी संपत नाही तोच पहाटेची गुलाबी थंडी आणि रात्रीलाही थंडीची चाहूल जाणवायला लागली. दिवाळीत २० अंशावर गेलेला पारा अवघ्या दोन-तीन दिवसातच घसरणीला लागला आणि १६ अंशावर येऊन ठेपला. साधारपणे बर्फाळ प्रदेशातून वारे यायला सुरुवात होते तेव्हा थंडी पडायला सुरुवात होते. हिवाळ्यात साधारपणे दोन ते तीन वेळा या वाऱ्यांचा वेग वाढतो आणि परिणामी थंडीचा जोरदेखील वाढतो.

त्यामुळे यावर्षीसुद्धा अशीच परिस्थिती अनुभवायला मिळणार आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळे, कमी दाब क्षेत्राचा प्रभाव यामुळे उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे आगमन सुरू झाले आहे.
हिवाळयात तापमानाचा पारा साधारणपणे १५ अंशावर जातो आणि यावेळीही तो जाईल. मात्र, त्याचवेळी अधूनमधून दिसणारे ढग असेच डोकावत राहिले तर त्याचा परिणाम थंडीवर होईल, असे प्रा. चोपणे यांनी सांगितले. हुडहुडी भरवणाऱ्या थंडीसाठी मात्र डिसेंबरचीच वाट पाहावी लागणार आहे.

Story img Loader