नागपूर : महापालिकेच्या परिवहन विभागाद्वारे नव्याने बस सुरु करण्यात आली आहे. या बसेस विविध मार्गावर धावणार आहेत. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सदर मार्गावरील फेऱ्यांचे वेळापत्रक खालील प्रमाणे राहणार आहे.
मोरभवन ते तितूर रेल्वे स्टेशन (कुचाडी, तितूर, चितापूर )या दरम्यान नव्याने बस सेवा सकाळी ६, पावणे अकरा वाजता, तर दुपारी १ वाजून ५ मिनिटांनी असेल. तितूर रेल्वेस्टेशन ते मोरभवन या दरम्यान सकाळी ७.४०, १२.२५, २.४० वाजता बस सुटणार आहे.
मोरभवन ते मंगरूळ ( डोंगरगाव मार्गे ) या दरम्यान सकाळी ९.१५, ४.४५ वाजता बस सुटणार आहे. मंगरूळ ते मोरभवन दरम्यान बस सकाळी १०.२० वाजता आणि सायंकाळी ६ वाजता बस सुटणार आहे.
मोरभवन ते वडेगाव काळे ( पाचगाव मार्गे ) या दरम्यान सकाळी ५.१५ वाजता, ७.४५, १०.३० वाजता बस सुटणार आहे तर दुपारी ४ वाजता बस सुटणार आहे.
वडेगाव काळे ते मोरभवन या दरम्यान सकाळी ६.१५, ९.१५ वाजता तर दुपारी १२ आणि सायंकाळी साडेपाच वाजता बस सुटणार आहेत.
मोरभवन ते खडगाव ( फेटरी, चिंचोली मार्गे ) या दरम्यान बस सकाळी साडेसहा, साडेसात, साडेआठ, साडेनऊ, १० वाजून ५० मिनिटे, ११ वाजून ५० मिनिटे, दुपारी अडीच वाजता, साडेतीन, साडेचार, ५ वाजून ५० मिनिटे, ६ वाजून ५० मिनिटे, ७ वाजून ५० मिनिटांनी बस सुटणार आहेत.
खडगाव ते मोरभवन या दरम्यान बस सकाळी साडेसात, साडेआठ, साडेनऊ, साडेदहा, ११ वाजून ५० मिनिटे, दुपारी १२ वाजून ५० मिनिटे, साडेतीन, साडेचार, साडेपाच, ६ वाजून ५० मिनिटे, ७ वाजून ५० मिनिटे आणि १० वाजून ५० मिनिटांनी बस सुटणार आहेत.
मोरभवन ते नितनवरे लॉन ( दाते ले-आऊट ) या दरम्यान बस दुपारी १२ वाजता आणि सायंकाळी ६ वाजता सुटणार आहेत. नितनवरे लॉन ते मोरभवन या दरम्यान बस सकाळी ७ वाजता, दुपारी १२.४० आणि सायंकाळी ६.४० वाजता सुटणार आहेत.