नागपूर : राजकीय विरोधकांचे कथित घोटाळे उघडकीस आणण्याचा दावा करणारे भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानेसध्या चांगलेचे चर्चेत आले आहेत. विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून सोमय्या यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा आणि भाजपच्या संस्कृतीप्रमाणे आचारण केल्याची जाहरी टीका काँग्रेसच्या शहर महिला अध्यक्षांनी केली आहे.
भाजप ज्या संस्कृती आणि विचारधारेला मानतो. त्यानुसार महिला म्हणजे वापराची उपभोगाची वस्तू आहे. सोमय्यांप्रमाणे यापूर्वी भाजपचे नेते चिन्मय आनंद, कुलदीपसिंह सेंगर, ब्रिजभूषणसिंह, संजय जोशी यांचेही कृत्य समोर आले आहे. ज्या पक्षाचा प्रमुख नेता पत्नीचा सन्मान करीत नाही. त्या पक्षातील इतर नेते असे कृत्य करण्याचे धाडस दाखवतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुस्तकात महिलांना उपभोगाची वस्तू म्हटले आहे. म्हणून आता भाजपच्या नेत्यांकडून बेटी बचाव म्हणण्याची वेळ आली आहे, अशी टीका महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष नॅश अली यांनी केली.
हेही वाचा >>>नागपूर: सौदी अरेबियातून दहशतवादी संघटनेशी जुळला अफसर, कोट्यवधीचा निधी जमवण्याची जबाबदारी
भाजप नेत्या चित्रा वाघ नेहमी महिलांवरील अन्यायाविरुद्ध आवाज उठवतात. त्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर आणि अशी विकृत मानसिकता असलेले जे भाजपचे बडे नेते आहेत. त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून पुढाकार घेतला पाहिजे. सोमय्या कथित भ्रष्टाचार मुक्त करण्याच्या वल्गना करतात. विरोधकांवर नेहमी शिंतोडे उडवतात. ईडी, सीबीआय, आयटी यामुळे त्रस्त करतात. त्यांच्या या चित्रफितून त्यांची प्रवृत्ती समोर आली आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) प्रदेश सरचिटणीस वर्षा श्यामकुळे यांनी दिली.