नागपूर: कोणत्याही कार्यक्रमासाठी अशाप्रकारे विद्यार्थ्यांकडून पैसे वसूली करणे तसेच पैसे न देणाऱ्या देणाऱ्या विद्यार्थ्यांची कागदपत्रे रोखून धरणे हा प्रकार अत्यंत गंभीर असून तसे करणे चुकीचे आहे. नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना बुधवारी पाचारण करण्यात येणार असून, त्यांच्याकडून खुलासा घेतला जाईल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला ७५ वर्षे झाली. त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्याकडून पैसे वसूल केले गेले होते. विद्यार्थ्यांवरील अन्यायाला ‘लोकसत्ता’ने वाचा फोडली होती. यासंदर्भातील वृत्त लोकसत्ता’ने शुक्रवारच्या अंकात प्रकाशित केले होते. याबाबत आमदार सचिन अहिर यांनी मुद्दा उपस्थित केला यावर उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी निर्देश दिले. अहिर यांनी मांडलेल्या मुद्याची गंभीर दखल घेत मंत्री पाटील यांनी आदेश दिले. अशाप्रकारे विद्यार्थ्याकडून पैसे उकळणे चुकीचे आहे. शिवाय पैशासाठी कागदपत्रे न देणे ही गंभीर चुक असल्याचे उच्च व तंत्रज्ञान मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Clarification from medical authorities platinum jubilee recovery case in legislative council mnb 82 ysh