अमरावती : अमरावती जिल्ह्यात पुन्हा आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यात संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. प्रहारचे आमदार राजकुमार पटेल यांना बच्‍चू कडू यांनीच शिवसेना शिंदे गटात पाठवले आहे. या मागे मोठे आर्थिक गणित आहे, असा आरोप रवी राणा यांनी केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांचे संगनमत आहे. प्रहारचे आमदार राजकुमार पटेल यांना शिंदेंकडे पाठवणे हे बच्चू कडू यांचीच ही खेळी आहे, असा  गौप्यस्फोट राणा यांनी केला. शिवसेनेने मेळघाटमध्ये राजकुमार पटेल यांना उमेदवारी दिल्यास आम्ही त्यांच्या विरोधात काम करू असा इशाराही राणा यांनी यावेळी दिला आहे.

Nana Patole criticizes government and law and order in state after attacked on saif ali khan in his house
सैफवरील हल्ला राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा; नाना पटोले यांची टीका
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Crime against city president of Shinde group fraud of Rs 1 crore 56 lakh by lure of job
शिंदे गटाच्या शहराध्यक्षाविरुद्ध गुन्हा, नोकरीचे आमिष दाखवून…
Image Of Walmik Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर परळीत तरुणीकडून आत्मदहनाचा प्रयत्न
Kalyan citizens beat youths who molested a girl
कल्याणमध्ये चिंचपाडा येथे मुलीची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना नागरिकांचा चोप
Rahul Gandhi in veer Savarkar defamation case
स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणात राहुल गांधींना जामीन
What Eknath Shinde Said?
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, “सरडाही रंग बदलतो, पण अशी नवी जात…”
eknath shinde shivsena
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, “सर्व पक्षांनी एकच रस्ता धरलाय, तो म्हणजे धनुष्यबाणाची शिवसेना”

हेही वाचा >>>नवी मुंबई विमानतळावर वायू दलाच्या लढाऊ विमानाची चाचणी लवकरच

आमदार बच्चू कडू हे सोयीनुसार राजकारण करीत असतात. त्यामुळे येणाऱ्या काळात बच्चू कडू यांचा हिशोब करू असा इशाराही रवी राणा यांनी दिला. ‘बाप बडा ना भय्या, सबसे बडा रुपय्या’ अश्या प्रकारे बच्चू कडू यांच राजकारण आहे या मागे मोठी आर्थिक गणित असल्याची टीका रवी राणा यांनी केली. काही दिवसां पूर्वीच राजकुमार पटेल यांनी शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला होता. तुम्ही आम्हाला एक धक्का दिला पण आम्ही पुढे तुम्हाला अनेक धक्के देऊ, असे वक्‍तव्‍य केले होते.

हेही वाचा >>>कळंबोली सर्कलची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ७७० कोटींचे उड्डाणपूल

राजकुमार पटेल यांनी शिवसेना शिंदे गटात सामील होण्‍याचा निर्णय घेतल्‍यानंतर बच्‍चू कडू यांनी त्‍यावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर टीका केली होती. भाजप आणि शिवसेना जी खेळी खेळत आहेत, त्‍याचा फटका त्‍यांना  विदर्भात बसेल, असा इशारा बच्‍चू कडू यांनी दिला. प्रत्‍येकाचा राजकीय स्‍वार्थ असतो, त्‍यामुळे राजकुमार पटेल हे पक्ष सोडून जात असतील, तर त्‍याची आम्‍हाला पर्वा नाही. त्‍यांनी सुखात रहावे. आम्‍ही विचारांसोबत कधीही तडजोड केली नाही. आम्‍ही सुद्धा त्‍यांच्‍याशी मैत्री कायम ठेवून राजकुमार पटेल यांच्‍या विरोधात उमेदवार देऊ, असा इशारा बच्‍चू कडू यांनी दिला होता.

दुसरीकडे, रवी राणा यांनी मात्र राजकुमार पटेल यांच्‍या शिवसेना प्रवेशामागे बच्‍चू कडू यांचीच खेळी असल्‍याचे सांगितल्‍याने वाद पेटण्‍याची शक्‍यता निर्माण झाली आहे. बच्‍चू कडू आणि रवी राणा यांच्‍यातील टोकाचा संघर्ष जिल्‍ह्याच्‍या राजकारणात पहायला मिळाला.

Story img Loader