नागपूर : भारतीय जनता पक्षाचे नेते मुन्ना यादव समर्थक आणि त्यांच्याच नातेवाईक कुटुंबीयातील बालू यादव यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. दोन्ही गटातील युवकांनी एकमेकांवर तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही गटातील तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. ही घटना शनिवारी रात्री नऊ वाजता अजनी चौकात घडली. जखमींवर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरण दोन्ही गटातील समर्थकांनी धंतोली पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली. त्यामुळे वरिष्ठ अधिकारीही पोलीस ठाण्यात उपस्थित झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप नेते मुन्ना यादव यांचा कुटुंबातील काही सदस्य बालू यादव यांच्यासोबत कौटुंबिक वाद सुरू आहे. त्यावरुन दोघांमध्ये नेहमी वादविवाद होत असतात. अनेकदा कौटुंबिक वाद धंतोली पोलीस ठाण्यात पोहचले आहेत. शनिवारी रात्री नवरात्रोत्सवनिमित्त गरब्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या गरब्यामध्ये करण यादव यांच्यासह काही अन्य नातेवाईक आणि मित्रही सहभागी झाले होते. त्याच गरब्यात बालू यादव यांचेही नातेवाईक सहभागी होते. यादरम्यान दोन्ही गटात जुन्या वादातून हाणामारी झाली. त्यामुळे दोन्ही गटातील समर्थक आमने-सामने उभे झाले. दोन्ही गटातील तरुणांनी तलवारी काढल्या. एकमेकांवर तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही कुटुंबीयांतील तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. जखमींवर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा…रत्नागिरी : नाटे परिसरात दिवसाढवळ्या बिबट्याची दहशत, विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात वन विभागाला यश

वाहनांची तोडफोड आणि दहशत

यादव कुटुंबीय समोरासमोर आल्यानंतर दोन्ही गटातील तरुणांनी आक्रमक पवित्रा घेतला. घरासमोर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. काही वाहनांची जाळपोळ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या हल्ल्यात जवळपास आठ ते दहा वाहनांची तोडफोड झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस अजनी चौकात गेले. तेथून काहींना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्यापाठोपाठ दोन्ही गटातील नातेवाईकही पोहचले.

हे ही वाचा…मुख्यमंत्री म्हणतात, “महाराष्ट्रात बुलेट ट्रेनच्या वेगाने विकास…”

धंतोली ठाण्यात गर्दी

यादव कुटुबांतील दोन्ही गटातील सदस्य धंतोली ठाण्यात पोहचले. त्यांनी एकमेकांविरुद्ध तक्रारी दिल्या. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता दोन्ही गटांतील सदस्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील जवळपास शंभरावर लोकांनी गर्दी केली होती. कायदा व सुव्यवस्था लक्षात घेता पोलीस उपायुक्तसुद्धा पोहचले. यादरम्यान, यादव कुटुंबातील एका सदस्याने पोलिसांशी दमदाटी करीत आरेरावी केल्याची माहिती समोर आली आहे.