वर्धा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदतर्फे घेण्यात आलेल्या पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्तीचा अंतिम निकाल जाहीर झाला असून पाचवीच्या २२.३१ तर आठवीचा १५.६० टक्के लागला आहे. निकालात कोल्हापूर जिल्हा प्रथम तर गडचिरोली जिल्हा सर्वात शेवटी आहे.वर्धा जिल्ह्यात शिष्यवृत्तीसाठी मंजूर असलेल्या संचा एव्हढे सुध्दा विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले नसल्याची माहिती शिक्षण खात्याकडून मिळाली.
कोल्हापूर जिल्ह्याचा पाचवीचा निकाल ४० टक्के व आठवीचा निकाल २९ टक्के लागला आहे.गडचिरोली जिल्ह्याचा पाचवीचा निकाल ७ टक्के तर आठवीचा निकाल ५.१० टक्के लागला आहे.परीक्षा दिलेल्या पाचवीच्या ५ लाख १४ हजार १३१ पैकी १ लाख १४ हजार ७१० विद्यार्थी पात्र ठरले.तर आठवीच्या ३ लाख ६७ हजार ८०२ पैकी ५५ हजार ५५८ विद्यार्थी पात्र ठरले.यातील शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांची एकूण दोन्ही मिळून संख्या ३१ हजार २५१ एवढी आहे.