वर्धा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदतर्फे घेण्यात आलेल्या पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्तीचा अंतिम निकाल जाहीर झाला असून पाचवीच्या २२.३१ तर आठवीचा १५.६० टक्के लागला आहे. निकालात कोल्हापूर जिल्हा प्रथम तर गडचिरोली जिल्हा सर्वात शेवटी आहे.वर्धा जिल्ह्यात शिष्यवृत्तीसाठी मंजूर असलेल्या संचा एव्हढे सुध्दा विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले नसल्याची माहिती शिक्षण खात्याकडून मिळाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोल्हापूर जिल्ह्याचा पाचवीचा निकाल ४० टक्के व आठवीचा निकाल २९ टक्के लागला आहे.गडचिरोली जिल्ह्याचा पाचवीचा निकाल ७ टक्के तर आठवीचा निकाल ५.१० टक्के लागला आहे.परीक्षा दिलेल्या पाचवीच्या ५ लाख  १४ हजार १३१ पैकी १ लाख १४ हजार ७१० विद्यार्थी पात्र ठरले.तर आठवीच्या ३ लाख ६७ हजार ८०२ पैकी ५५ हजार ५५८ विद्यार्थी पात्र ठरले.यातील शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांची एकूण दोन्ही मिळून संख्या ३१ हजार २५१ एवढी आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Class 5th and 8th scholarship results announced kolhapur is the top and gadchiroli is the last pmd 64 ysh