नागपूर : इंस्टाग्रामवरून ओळख झाल्यानंतर मित्राने जाळ्यात ओढून घरी नेले. त्याने मैत्रिणीला शारीरिक संबंधाची मागणी केली.मात्र, तिने नकार दिला. त्यामुळे मित्राने तिच्यावर बळजबरी बलात्कार केला. त्यामुळे ती मुलगी नैराश्यात गेली. मात्र, आईने तिची आस्थेने विचारपूस केल्यामुळे हे बलात्कार कांड उघडकीस आले. या प्रकरणी तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी तौसीफ कदीर खान (कोतवाली) याला अटक केली.

पीडित १६ वर्षीय मुलगी दुर्गा (काल्पनिक नाव) हिला वडिल नसून आईसह ती राहते. तिची इंस्टाग्रामवरून कोतवालीत राहणाऱ्या तौसीफ खान याच्याशी ओळख झाली. काही दिवस दोघे इंस्टाग्रामवर मँसेज करीत होते. तौसीफ याली दुर्गाला प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे होते. त्यामुळे तो रोज तिच्या घराकडे चकरा मारत होता. तिच्यासोबत महाविद्यालयापर्यंत सोबत जात होता. तौसीफने १ एप्रिलला दुर्गाला प्रपोज केले. मात्र, तिने स्पष्टपणे प्रेमास नकार दिला. त्यामुळे निराश झालेल्या तौसीफने तिला माफी मागून यापुढे मैत्री कायम ठेवण्यासाठी तिला गळ घातली. त्यामुळे दुर्गाने त्याला माफ केले. त्यानंतर काही दिवस दोघांची मैत्री कायम होती.

mumbai 16 year old deaf mute girl raped
मुंबई : मूक-बधीर मुलीवर लैंगिक अत्याचार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
vidya balan bhool bhulaiyaa 3
‘भूल भुलैया -३’मधली माधुरी आणि माझी जुगलबंदी अविस्मरणीय…- विद्या बालन
bihar man murder Mumbai
मुंबई: हातावर गोंदवलेल्या प्रेयसीच्या नावामुळे लागला हत्येचा छडा, प्रेमप्रकरणावरून बिहारमधील तरुणाची मुंबईत हत्या
Kashmiri Girl Suicide
Kashmiri Girl Suicide : बॉयफ्रेंड नीट बोलत नाही म्हणून बँक ऑफ अमेरिकेतील काश्मिरी तरुणीची हैदराबादमध्ये आत्महत्या
radhika deshpande
“त्या व्यक्तीने मला…”, मराठी अभिनेत्रीबरोबर १६ व्या वर्षी घडलेली धक्कादायक घटना; म्हणाली, “मी त्याच्या कानाखाली दिली”
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू

हेही वाचा >>> वसतिगृहातून परतलेल्या मुलांमध्ये नैतिकता नसते!; माजी कुलगुरू डॉ. चांदेकर यांचा अजब तर्क

यादरम्यान तौसीफने तिला बर्थडे पार्टी असल्याचे सांगून घरी येण्याची विनंती केली.३० एप्रिलला दुपारी तीन वाजता ती तौसीफच्या घरी गेली. त्याने केक आणला होता, परंतु पार्टीचे कोणतेही आयोजन नव्हते. त्यामुळे दुर्गाला आश्चर्य वाटले. तिने विचारणा केली असता ‘फक्त तुलाच सरप्राईज पार्टी द्यायची होती’ असे सांगून वेळ मारून नेली. दोघांनी केक कापला आणि नंतर त्याने तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, तिने नकार देऊन मैत्री तोडण्याची भाषी केली. त्यामुळे तौसीफने घराचे दार बंद करीत तिच्याशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. नकार दिल्यानंतरही तौसीफने गैरकृत्य केल्यामुळे ती निराश झाली.

हेही वाचा >>> नागपूरमध्ये अंबाझरी तलावासह धरणेही तुडुंब, पावसाळी पर्यटनही जोरात

मनाच्या विरुद्ध घडलेल्या घटनेमुळे ती नैराश्यात गेली. ती अबोल झाली आणि स्वत:ला दोषी मानायला लागली. घरातील तिचे वागणे, बोलणे बदललेले. तिचे अभ्यासात मन लागत नव्हते. ही बाब तिच्या आईच्या लक्षात आली. मुलीसोबत नक्कीच काहीतरी अनुचित घडल्याचे वाटले. आईने तिची आस्थेने चौकशी केली असती ती ढसाढसा रडायला लागली. तिने तौसीफने घरी बोलावून शारीरिक संबंध केल्याचे सांगितले. आईने तिला धीर दिली आणि कोतवाली पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक केली.