चंद्रपूर : केंद्रीय पर्यावरण, वने आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाने केंद्रीय प्रदूषण नियंण मंडळाच्या माध्यमातून २०१९ पासून ‘नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम’ अर्थात राष्ट्रीय स्वच्छ वायू सर्वेक्षण सुरू केले आहे. यात वायू प्रदूषणात आघाडीवर असलेली देशातील १३१ आणि महाराष्ट्रातील १९ शहरे समाविष्ट करण्यात आली आहेत. या शहरांना २०२४ पर्यंत २० ते ३० टक्के सूक्ष्म धूलिकण कमी करण्याचे ध्येय देण्यात आले आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी चांगले कार्य करणाऱ्या शहरांना पुरस्कृत करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात मोठ्या शहरांतील वर्गवारीत ठाणे तिसऱ्या क्रमांकावर असून मध्यम शहराच्या वर्गवारीत अमरावतीने पहिला क्रमांक प्राप्त केला आहे. विदर्भातील चंद्रपूर १५ व्या तर नागपूर १८ व्या क्रमांकावर आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केंद्रीय पर्यावरण, वने आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून हे अभियान सुरू केले आहे. याद्वारे वायू प्रदूषणात आघाडीवर असलेल्या शहरांना वायू प्रदूषण कमी करण्यासाठी काही सूचना करण्यात आल्या होत्या. तसेच यादरम्यान वायू प्रदूषणात उत्तम कामगिरी करणाऱ्या शहरांना बक्षिसे देण्यात येणार होते. नुकतेच केंद्रीय पर्यावरण, वने आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाने स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२३ चे पुरस्कार जाहीर केले आहे.

हेही वाचा – “मंत्री खातात तुपाशी, रुग्ण मारतो उपाशी!” विरोधकांचा आरोग्यमंत्र्यांविरोधात हल्लाबोल; मास्क, टेथेस्कोप अन् स्ट्रेचर घेऊन….

हेही वाचा – “मग न्यायमूर्ती लोया प्रकारणाचीही चौकशी करा”, अंबादास दानवे यांची मागणी

राज्यात वायू प्रदूषणाबाबत उत्तम कामगिरी करणाऱ्या शहरांमध्ये अमरावती प्रथम, ठाणे तृतीय, नवी मुंबई आठव्या, मुंबई दहाव्या तर सर्वसाधारण प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये चंद्रपूर पंधराव्या, लातूर सतराव्या, नागपूर सतराव्या स्थानी आहे. वाईट कामगिरी करणाऱ्या शहरांमध्ये नाशिक २१, पुणे २९, वसई विरार ३२, औरगांबाद ४०, सोलापूर १९, कोल्हापूर २३, बदलापूर ३०, उल्हरासनगर ३१, अकोला ३२, जळगाव ३३, सांगली ३५ आणि जालना ३६ व्या क्रमांकावर आहे. हे सर्व पुरस्कार उत्कृष्ट घनकचरा, जैविक कचरा व्यवस्थापन आणि कचरा ज्वलन रोखणे, रस्त्यावरील धूलिकणाचे नियंत्रण, बांधकामावरील धूलिकणाचे नियंत्रण लक्षात घेऊन हे पुरस्कार देण्यात आले आहे, अशी माहिती स्काय वाॅच ग्रुपचे सुरेश चोपणे यांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Clean air survey ranking of cities announced chandrapur at 15th position rsj 74 ssb