चंद्रपूर : चंद्रपूर महापालिकेतील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे किमान वेतनासाठी मागील चार दिवसापासून संपावर आहे. सफाई कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्याने शहरातील रस्त्यांची साप-सफाई झाली नाही. त्यामुळे रस्त्यावरमोठ्या प्रमाणात कचरा निर्माण झाला आहे. तसेच चौका-चौकात कचऱ्यांचे ढीग तयार झाल्याने दुर्गंध सुटू लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापालिकेत कार्यरत कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी ५ ऑक्टोबरपासून किमान वेतन देण्यात यावे या मागणीला घेवून पालिकेच्या प्रवेशव्दारासमोर आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाला चार दिवस लोटले आहे. मात्र, यावर पालिका प्रशासनाने कोणताही तोडगा काढलेला नाही. कंत्राटी कर्मचारी आंदोलनावर ठाम असल्याने मागील चार दिवसापासून शहरातील रस्ते व घरोघरी कचरा उचलण्याचे काम बंद आहे. शहरातील रस्त्यांची साफ-सफाई झाली नसल्यामुळे रस्त्यावर कचऱ्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

हेही वाचा >>> बी.ए., बी.कॉम. करायचे आहे, मग मोजावे लागणार ‘इतके’ रुपये; विद्यापीठाचे नवे दरपत्रक जाहीर

तसेच घरोघरी जावून कचरा संकलन करणारे कर्मचारीसुध्दा संपावर असल्याने घरातील कचरा नागरिकांना मोकळ्या जागी टाकण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे चौका-चौकात कचऱ्यांचे ढीग तयार झाले आहे. या कचऱ्यांपासूर दुर्गंधी सुटू लागल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान पालिका प्रशासनाने आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मोटराइज्ड घंटागाडीतच व्यवस्था केली आहे. मात्र, ही मोटराइज्ड घंटागाडी घरोघरी जावून कचरा संकलन करण्यास पर्याप्त नसल्याचे आंदोलक कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा >>> Talathi Recruitment: भावी तलाठींची अंतिम गुणवत्ता यादी ‘या’ तारखेला होणार जाहीर, कधीपर्यंत मिळणार नियुक्तीपत्रे?

मोटराइज्ड घंटागाडीवरील चालकाला शहरातील संपूर्ण परिसर व प्रत्येक घर माहित नसल्यामुळे घरोघरी जावून कचरा संकलन करणे अवघड जात आहे. घंटागाडी चार दिवसापासून आल्या नसल्याने नागरिकांनी चार दिवसापासून घरात साचलेला चकरा उघड्या जागेवर फेकण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे चौकात कचऱ्यांचे ढीग तयार झाले आहे. या कचऱ्यांच्या ढीगापासून वास व दुर्गंधी येवू लागली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर शहरात डेंग्यू या आजाराने तिघांचा मृत्यू झाला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cleaning staff on strike of garbage everywhere in the city rsj 74 ysh
Show comments