लोकसत्ता टीम

वर्धा : मंत्रिपदी वर्णी लागण्याची बाब सत्ताधारी पक्षातील आमदारासाठी मोठीच संधी. आयुष्याचे सार्थक झाल्याची भावना ओघाने आलीच. वर्ध्याचे आमदार डॉ. पंकज भोयर हे मंत्री झाले त्याचे श्रेय अनेक घेतात. त्याबद्दल भोयर हे अशा सर्वांचे आभार पण मानतात. मात्र आशीर्वाद घेण्यास आई वडिलांनंतर त्यांनी प्राधान्य दिले ते एकाच नेत्यास.

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Bharatiya Janata Party continues to pursue the state government for waiver of penalty on property tax panvel municipal corporation
पनवेल: शास्तीमाफीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा
mmrda acquire farmers lands in 124 villages of uran panvel and pen for third mumbai
भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांची एकजूट; उरण, पनवेलमधील १२४ गावे संपादित करण्याची अधिसूचना
43 ministers maharashtra
विश्लेषण : महाराष्ट्रात ४३ मंत्रीच? मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या किती असते? या संख्येवर बंधने का असतात?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
Devendra Fadnavis returns as Chief Minister and visits his hometown for first time at 3 pm Thursday
मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला १०० दिवसांचे लक्ष्य
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक

भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे बोट धरून भोयर हे भाजपात आले. आमदार आणि आता मंत्रिपद यासाठी मेघे यांचे आशीर्वाद कामास आल्याची त्यांची भावना. ती ते पदोपदी व्यक्त करतात. मंत्रिपदाची शपथ घेण्यास निघण्यापूर्वी ते मेघे यांना भेटून नागपुरात विधिमंडळात निघाले. तिथे आई कांचनताई व वडील डॉ. राजेश भोयर यांच्या समवेत पोहचले. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून म्हणाले की, मेघे साहेबांना येथे घेऊन येतो. तेव्हा तत्पर उत्तर देत फडणवीस म्हणाले की, अशी घाई करू नको. त्याची प्रकृती नाजूक आहे. त्रास होईल. आपण त्यांच्या घरीच आशीर्वाद घेण्यास जाऊ. असे ठरल्यानुसार आज मुख्यमंत्री फडणवीस व भोयर हे मेघे यांच्या खामला येथील निवासस्थानी भेटीस जाणार आहेत. गृह राज्यमंत्री झालेले भोयर यांनी यास पुष्टी दिली.

आणखी वाचा-मुख्यमंत्रीपदासह विदर्भाला मिळालेली महत्वाची खाती कोणती?

तत्पूर्वी आमदारकीची शपथ घेण्यास मुंबईत जाण्यापूर्वी डॉ. भोयर हे मेघे यांच्या नागपूर निवासस्थानी भेटून आले होते. आज भोयर यांचा वर्ध्यात नागरी सत्कार आहे. मेघे असतील तरच मी सत्कार स्वीकारणार, अशी अट भोयर यांनी आयोजकांना टाकली होती. त्यामुळे पेच निर्माण झाला होता. कारण रोटरी मेळ्याचे उद्घाटन मेघे यांच्या हस्ते दोन दिवसापूर्वी करण्याचे ठरले होते. त्यामुळे सलग दोन दिवस प्रवास शक्य नाही, असे कुटुंबाचे म्हणणे पडल्याने मग रोटरी की सत्कार असा तिढा उद्भवला. तेव्हा वर्ध्यातून आयोजक मेघे यांना भेटण्यास गेले.

रोटरीचे प्रांतपाल महेश मोकलकर हे पण निस्सीम मेघे भक्त. मेघे असल्याशिवाय रोटरी मेळा झाला नाही, असे त्यांनी स्पष्ट केल्यावर तडजोड झाली. मेळा औपचारिक सूरू करण्यात आला व आज मेघे हे सत्कार आटोपल्यानंतर तिथे पोहचणार. मंत्री झाल्यानंतर डॉ. भोयर हे प्रथमच वर्ध्यात येत आहे. सत्कार कार्यक्रमास हजर होण्यापूर्वी ते थेट सावंगी येथे जाणार. तिथे मेघे यांना सोबत घेऊन मग सत्कार स्थळी येतील.मेघे यांनी राजकारणात अनेकांना मोठे केल्याचे सांगितल्या जाते. पण पदोपदी ऋण व्यक्त करणारा शिष्य हा असा पहिलाच, अशी प्रतिक्रिया मेघे यांच्या ज्येष्ठ स्नेह्याने दिली.

Story img Loader