नागपूर : कृत्रिम बुद्धीमत्ता आणि तत्सम क्षेत्रात तत्रंज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळे आपल्या मनातील कल्पनांना मूर्त रुप देणे शक्य झाले आहे. नवनवे संशोधन (इनोव्हेशन) होत आहेत, त्याला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्रात इनोव्हेशन सिटी तयार करणार आहे, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे केले.
नागपूरमध्ये सुरू असलेल्या संगणक प्रदर्शनाला (कॉम्प-एक्स २०२५) फडणवाीस यांनी शुक्रवारी भेट दिली. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात त्यांनी वरील मत व्यक्त केले. ते म्हणाले, हे स्टार्टअपचे युग आहे. महाराष्ट्र देशात या क्षेत्रात प्रथम क्रमांकावर आहे. युवकांचा कल कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित (एआय) स्टारटप सुरू करण्याकडे अधिक आहे. संपूर्ण जगच या दिशेने वाटचाल करीत आहे. नागपूर विदर्भातही यासंदर्भात एक व्यवस्था तयार झाली आहे.
हेही वाचा…बुलढाणा : खळबळजनक! अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार
ए.आय.च्या माध्यमातून रोज नवनवे इनोव्होशन होत आहे. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने महाराष्ट्रात इनोव्हेशन सिटी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. संगणकीय क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानामुळे आपल्या मनात असलेल्या कल्पनांना मूुर्त रुप देणे शक्य झाले. विविध क्षेत्रात होणाऱ्या संशोधनासाठी इनोव्हेशन सिटी तयार करणे ही काळाची गरज झाली आहे. आगामी काळात तंत्रज्ञान क्षेत्रातही महाराष्ट्र अग्रेसर असेल,असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान नागपूरच्या ट्रिपल आयटीमध्ये गुगलचे ए.आय.एक्सलन्स केंद्र सुरू करणार असून याबाबत मुंबईत करार झाल्याची माहितीही फडणवीस यांनी यावेळी दिली.