नागपूर येथील भाजपाच्या विजय संकल्प सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर चांगलेच तोंडसुख घेतले. भाजपाने अनुसूचित जातीसाठी मोठे काम केले असून काँग्रेसने फक्त त्यांचा ‘व्होटबँक’ म्हणून वापर केल्याची टीका त्यांनी केली. भाजपा सरकारमुळे इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक होत असून २०२० ला हे स्मारक पूर्ण होईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. काँग्रेसचा इंदू मिलच्या जागेवर डोळा होता. त्यामुळेच केंद्रात व राज्यात काँग्रेसचे सरकार असतानाही स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळू शकली नाही. मात्र, भाजपाचे सरकार सत्तेवर येताच स्मारकाला जागा तर मिळालीच शिवाय मोठ्या प्रमाणात निधीही मिळाला. काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या आई-बापांचे स्मारक उभा केले. पण त्यांनी बाबासाहेबांच्या स्मारकासाठी जागा दिली नाही. काँग्रेसने अनूसूचित जातीचा फक्त वापरच केला, असा आरोप त्यांनी केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा