नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवीन वर्षात पहिल्याच दिवशी नक्षल प्रभावित गडचिरोली जिल्ह्यात गेले. एका शाळेतील मुलांशी त्यांनी संवादही साधला. आपल्याला गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री व्हायला आवडेल, असे फडणवीस म्हणाले होते. त्याअनुषंगाने नववर्षाच्या पहिल्या दिवशी त्यांनी केलेला गडचिरोली जिल्हा दौरा महत्वाचा ठरतो.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स.११ वा.च्या सुमारास आगमन झाले. तेथे त्यांचे विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी स्वागत केले. तेथून ते हेलिकॉप्टरने गडचिरोलीला गेले. तेथे त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उदद्घाटन आणि भूमिपूजन झाले. त्यांनी गडचिरोलीमधील शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अनेकांशी हस्तांदोलन केले. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्याचा संकल्प त्यांनी या दौऱ्यात व्यक्त केला. गडचिरोलीला स्टील सिटी म्हणून नावारुपास आणणार याचा पुनरुच्चारही केला.

hindu temple attacked in canada (1)
Video: “कॅनडात हिंदूंवर झालेला हा हल्ला म्हणजे…”, अमेरिकन संसदेतील मराठमोळे सदस्य श्री ठाणेदार यांचं परखड भाष्य!
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
post for cleaning job in bombay high court salary rs 52000 per month
उच्च न्यायालयात सफाई कामगाराची जागा, पगार तब्बल ५२ हजार…
Bigg Boss Marathi season 5 fame Vaibhav Chavan and irina Video viral
Video: “लवकर लग्न करा”, ‘बिग बॉस मराठी’ फेम वैभव चव्हाण आणि इरिनाच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया; म्हणाले, “आम्हाला वहिनी हिच पाहिजे”
What are ‘A, B’ forms & why they are crucial what is ab form why does the ab form matter
विधानसभा निवडणुकीआधी ‘एबी’ फॉर्मची चर्चा; एबी फॉर्म म्हणजे काय? निवडणुकीत या फॉर्मला इतके महत्त्व का?
Bigg Boss 18 Vivian Dsena Gives New Name To Karan Veer Mehra
Bigg Boss 18: विवियन डिसेनाने करणवीर मेहराला दिलं नवीन नाव, म्हणाला…
court fines matrimony portal pixabay
विवाह इच्छूक तरुणासाठी वधू शोधू न शकलेल्या मॅट्रिमोनियल पोर्टलला न्यायालयाचा दणका, ठोठावला ६० हजारांचा दंड

हेही वाचा >>> रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे…‘या’ गाड्यांमध्ये आजपासून झाले बदल

फडणवीस यांनी नागपूरमध्ये गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे महायुतीतील तीनही घटक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून पालकमंत्रीपदाबाबतअंतिम निर्णय घेतील. पण माझी गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करण्याची इच्छा आहे, असे फडणवीस म्हणाले होते. त्यानंतर नववर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी गडचिरोली जिल्ह्याला भेट देऊन विविध कार्यक्रमात भाग घेतला. त्यामुळे तेच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले असून अनेक नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले.

हेही वाचा >>> चंद्रपूर – नागपूर मार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघे ठार

फडणवीस यांच्या दौऱ्यातही एक नक्षलवादी शरण येणार असल्याचे संकेत आहे. नक्षलवाद गडचिरोली जिल्ह्यातील विकासात अडसर ठरला होता. मात्र महायुती सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री असताना या जिल्ह्यात पोलाद प्रकल्पाची पायाभरणी केली. खनिज संपत्तीवर आधारित उद्योग उभारणीला सुरूवात केल्याने हा जिल्हा पोलाद नगरी म्हणून नावारुपास येण्याची शक्यता आहे. आता फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने त्यांनी या जिल्ह्याच्या विकासासाठी केलेल्या घोषणांना मूर्तरुप येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नवीन वर्षातील हा पहिलाच गडचिरोली दौरा अनेक कारणांनी महत्वाचा ठरला आहे. त्यांच्या या दौऱ्यामुळे पोलीस दल व प्रशासनासोबत या भागातीलत जनतेच्या मनातही आत्मविस्वासाची भावना निर्माण होण्यास मदत होणार आहे.

Story img Loader