नागपूर: नागपूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. मौदा तालुक्यातील तारसा, निमखेडा या गावांना त्यांनी भेटी दिली.
नागपूर जिल्ह्यामध्ये या पावसात जवळपास १२४ गावांना फटका बसला आहे ८५२ हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले असून सर्वाधिक नुकसान मौदा तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे झाले आहे. मौदा तालुक्यात रामटेक पारशिवणी तालुक्यातही नुकसान झाले आहे. जिल्ह्यात धानासोबतच कापूस तूर संत्रा पिकांचे नुकसान झाले आहे.
हेही वाचा… रोहणा गावात दोन गटात वाद; गोळीबारात एक ठार, दोघे गंभीर जखमी; खामगाव तालुक्यासह जिल्हा हादरला!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन झालेल्या नुकसानाची पाहणी केली.यावेळी त्यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची चर्चा केली. विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.