बुलढाणा : बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड म्हणजे वाद, वादंग, असे समीकरणच झालंय!  त्यांच्या एका दृश्यफितीमुळे ते आज, शनिवारी पुन्हा एकदा चर्चेत आले. आज दुपारपासून त्यांची दृश्यफीत सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे…मात्र ही दृश्यफीत नेहमीसारखी वादग्रस्त नाही तर राजकीय विषयावरील शांत अन् ‘सूचक’ आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> सुजात आंबेडकर यांच्‍या उमेदवारीसाठी अमरावतीत ठराव

यामध्ये आमदार संजय गायकवाड हे त्यांचे लाडके व घनिष्ठ, थेट संबंध असलेले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे स्वागत वा अभिनंदन करताना (की आभार मानताना) दिसत आहे. वरील बाजूला केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छायाचित्रे आहेत. मात्र, यावेळी गुंजणारे शब्दांचे बोल सूचक आणि अर्थगर्भ आहेत. त्यात बहुचर्चित, ‘आ रहे है भगवाधारी, राजतीलक की करो तयारी।’ या दोन सूचक व आणखी दोन ओळी आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी बदलण्याच्या व आमदार संजय गायकवाड यांना संधी मिळण्याची बातमी प्रकाशित झाल्यावर आमदार समर्थकांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.