चंद्रपूर: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चंद्रपूरात आयोजित श्री माता महकाली महोत्सवाच्या पहिल्या टिझरचे लाँचींग करण्यात आले आहे. मुंबई येथे मुख्यमंत्री यांनी सदर टिझरची लाँचींग केली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांची उपस्थिती होती.
माता महाकाली महोत्सवाची जय्यत तयारी चंद्रपूरात सुरु आहे. १९ ऑक्टोबर पासून महोत्सवाला सुरवात होणार आहे. यासाठी विविध नामांकित कलाकार चंद्रपूरात येणार असून या दरम्यान सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कायक्रमांचे आयोजन नियोजित करण्यात आले आहे. मागच्या वर्षी पार पडलेल्या श्री महाकाली महोत्सवला नागरिकांचा मिळालेला सहभाग लक्षात घेता यंदाचेही महोत्सव भव्य होणार असल्याचा अंदाज आहे.
हेही वाचा… शाळेत सोडतो, असे सांगून चिमुरडीला शेतात नेले अन् केलं भयंकर कृत्य; उमरखेड येथील घटनेने संताप
दरम्यान, आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथील वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री माता महाकाली महोत्सवच्या पहिल्या टिझरची लाँचिंग करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महोत्सवाबाबत आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून माहिती जाणून घेतली आहे.
हेही वाचा… पातूरचे गणेशोत्सव मंडळ राज्यात ठरले अव्वल; आकर्षक पर्यावरणपूरक सजावट
सदर टिझरमध्ये यंदाच्या महाकाली महोत्सवातील आकर्षण दर्शविण्यात आले आहे. विशेष म्हणजे यापुर्वी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेत त्यांना श्री माता महाकाली महोत्सवाची निमंत्रण पत्रिका दिली आहे. यावेळी त्यांनी माता महाकालीच्या दर्शनासाठी महोत्सवदरम्यान चंद्रपूरात येणार असल्याचे म्हटले आहे.