मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासहीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील काही मंत्र्यांचा समावेश असलेल्या कथिक भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवरुन हिवाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक वाद सुरु आहे. अशातच मुख्यमंत्री शिंदेंनी या विषयावर विधानपरिषदेत भाष्य करताना म्हणींच्या माध्यमातून विरोधकांवर टीका केली. मात्र शिंदेंनी वापरलेली हिंदी म्हण ऐकून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हिंदीमिश्रीत मराठीमध्ये केलेल्या एका विधानामुळे बुधवारी सभागृहात एकच हशा पिकल्याचं पहायला मिळालं.

मुख्यमंत्री शिंदेंनी आपण उघडपणे बंड केल्याचं आपल्या भाषणात अधोरेखित केलं. “आम्ही तर उघडपणे केलं सगळं. जगजाहीरपणे केलं. सगळ्या जगाने पाहिलं. आम्ही काही लपवलं नाही. आमची भूमिका का घेतली हे सगळ्यांना माहिती आहे. आंबादासलाही माहिती आहे. पण तो बोलणार नाही. सभापती मोहोदया आम्ही का भूमिका घेतली याचं कारण सर्वांना ठाऊक आहे. यावर सभापती निलम गोऱ्हेंनी, “विषयावर या” असं मुख्यमंत्र्यांना सांगितलं. “नाही जे बोललेत ना त्यावरच मी बोलतोय,” असं उत्तर मुख्यमंत्री शिंदेंनी दिलं.

News About Eknath Shinde
Eknath Shinde : ठाकरे-फडणवीसांची भेट, महायुतीत एकनाथ शिंदेंच्या नाराजीचा दुसरा अंक?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Eknath Shinde Shivsena Demand
Shivsena : “बाळासाहेबांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवा”, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी
Eknath Shinde on Santosh Deshmukh Murder Case
Eknath Shinde: “कुणाचेही लागेबंधे असले तरी…”, संतोष देशमुख प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा
Eknath Shinde , Rickshaw ,
VIDEO : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हाती पुन्हा रिक्षाचे स्टेरिंग, शिंदे यांनी दिला जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा
dcm eknath shinde loksatta news
“सर्वसामान्यांसाठी राज्यात परवडणारे घरी उभारण्याचा आमचा अजेंडा”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
Devendra Fadnavis talk about his political career in BJP and about RSS
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कबुली, म्हणाले, “संघ स्वंयसेवकाला आदेश पाळायचा असतो, तेच मी केले म्हणून भाजपमध्ये…”
What Eknath Shinde Said?
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, “सरडाही रंग बदलतो, पण अशी नवी जात…”

नक्की वाचा >> “साहेब सध्याचे मुख्यमंत्री…”; जाहीर कार्यक्रमात पुणेकराने शिंदेंचा केलेला तो उल्लेख ऐकून राज ठाकरेंनीच कपाळाला हात लावला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील काही दिवसांपासून अब्दुल सत्तारांबरोबरच शिंदे-फडणवीस सरकारमधील काही नेत्यांचा सहभाग केलेल्या कथित प्रकरणांबद्दल केलेल्या विधानांवरुन हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक असा संघर्ष पहायला मिळाला असतानाच मुख्यमंत्र्यांनी याच मुद्द्यावरुन विरोधकांना टोला लगावला. “काय वाटेल ते बोलायचं. तोंडाला येईल ते बोलायचं. एक सहनशक्ती असते. मर्यादा असते. आम्ही कधीही चुकीचं वक्तव्य कधी केलं नाही आणि करणार नाही. पण काही वेडंवाकडं देखील सहन करणार नाही. गेल्या ५-१० वर्षांमध्ये जो भ्रष्टाचार केलाय तो पाहा. तुम्ही तीन-चार मंत्र्यांना बदनाम करता. अरे मंत्री जेलमध्ये गेले तरी त्यांचा राजीनामा घेतला नव्हता तुम्ही,” अशी आठवण शिंदेंनी विरोधकांना करुन दिली.

नक्की वाचा >> “काही पोपट पिंजऱ्यातून बाहेर येतात आणि…”; शेलक्या शब्दांमध्ये CM शिंदेंनी संजय राऊतांना केलं लक्ष्य! म्हणाले, “सकाळी लोक…”

“मंत्री तुरुंगात गेले तरी राजानीमे घेतले नाही पण आता बदनामी करत आहेत. जो शीशे के घर मे रहता है वो दूसरों के घर पर पथ्थर फेका नही करते,” असं म्हणत शिंदेंनी महाविकास आघाडीतील पक्षांना टोला लगावला. त्यानंतर जवळच बसलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिश्कीलपणे टोला लगावत, “शीशे मे रेहनेवाले घर मे कपडे भी नही बदला करते” असं विधान केलं. हे विधान ऐकून सर्वच सभासद हसू लागले. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या मागील रांगेत बसलेले मंत्री चंद्रकांत पाटील यांनाही फडणवीसांचं विधान ऐकून हसू अनावर झालं. “शीशे मे रेहनेवालो को कपडे बदलने की आवश्यता नाही फिर भी बदलते है वो,” अशी प्रतिक्रिया या विधानावर मुख्यमंत्री शिंदेंनी हसत हसतच दिली.

Story img Loader