वर्धा : समुद्रपुर तालुक्यातील पाथरी येथील पाटील कुटुंब पूर्णतः शेतीत रमणारे. नव्या पिढीनेही हा वारसा आता चालविला आहे. घरात आलेली सून स्वतः शेतीत वेळ देणारी आणि म्हणून तिलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट घालून देण्यात आली. त्यावेळी स्ट्रॉबेरीची चव मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली. “मी पण माझ्या सातारा येथील शेतीत स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतो. पण त्यापेक्षा ही फळे अधिक चवदार व आकर्षक रंगाची आहेत”, अशी पावती मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे भारती महेश पाटील यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : एनआयएची अचलपुरात छापेमारी, युवकाची चौकशी; कारवाईबाबत कमालीची गुप्तता…

पती महेश पाटील यांच्यासह त्यांची ही भेट जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी घालून दिली होती. गावात गेल्या दोन वर्षांपासून पाटील कुटुंब स्ट्रॉबेरी पिकवत आहे. उष्ण कटिबंधात असलेल्या शेतीत हे थंड हवामानातील पीक घेण्यावेळी अनेकांनी त्यांना असे धाडस न करण्याचा सल्ला दिला होता. पण आज ते तर उत्पादन घेतातच पण अन्य शेतकऱ्यांनाही त्यांनी प्रोत्साहन दिले आहे. एकूण अकरा एकर परिसरात लागवड होत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या सोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आमच्या स्ट्रॉबेरीची चव चाखली, असे त्या नमूद करतात. पाच एकरात किमान ६० ते ७० लाख रुपयाचे उत्पन्न होणार असल्याचे पाटील सांगतात. जिल्हाधिकारी कर्डिले म्हणाले की, मी स्वतः ही शेती पाहिली. हे पीक अधिकाधिक शेतकऱ्यांनी घ्यावे म्हणून कृषी विभागातर्फे प्रयत्न सुरू आहे. भविष्यात हे क्षेत्र निश्चितच वाढेल.