सत्तांतरानंतर प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भंडारा जिल्ह्यात दौरा होत आहे. मुख्यमंत्र्यांसमोर भंडारा शहर ‘स्मार्ट सिटी’ दाखवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची दमछाक झाली आहे. विविध विकास कामांच्या भूमिपूजनासाठी येत असलेल्या मुख्यमंत्र्यांना प्रभावित करण्यासाठी शहराचा ‘कृत्रिम विकास’ करण्याचे काम युद्धस्तरावर करण्यात आले आहे.

शास्त्री चौकातील फुटपाथधारकांना कोणत्या प्रकारची पूर्वसूचना न देताच त्यांच्या दुकानांवर बुलडोझर चालवून जमीनदोस्त करण्यात आली आहेत. भंडारा-शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेल्या खांब तलाव परिसरातील सिमेंट रस्ता बांधकामासाठी गेल्या ५० दिवसांपासून साखळी उपोषणावर बसलेल्या जय जवान, जय किसान संघटनेचा उपोषण मंडप मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शुक्रवारी पहाटे हटवला. निषेध करणाऱ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी बळाचा वापर करून शुक्रवारी दुपारी ३ वाजता अटक केली. उपोषण मंडप परिसरातून मुख्यमंत्र्यांचा ताफा जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पहाटे अचानक खांब तलाव चौकातील मंडप हटवण्यात आला. दुपारी ३ वाजता आंदोलकांना पोलिसांनी बळाचा वापर करून अटक केली. जय जवान, जय किसान संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन घनमोर, मनीष सोनकुसरे, संजय मते, जगदीश कडव, प्रवीण बोरघरे यांना अटक करण्यात आली.

police action on massage parlour misbehavior is going on in name of massage parlour
मसाज पार्लरच्या नावाखाली गैरप्रकारांवर कारवाईचा बडगा, वर्षभरात पोलिसांकडून ३३ गुन्हे दाखल
Daily zodiac sign horoscope For 17 December 2024
१७ डिसेंबर पंचांग: १२ पैकी ‘या’ राशींचे प्रगतीच्या…
Illegal building on road in Nandivali Samarth Chowk demolished
मानपाडा-बाह्यवळण रस्ता ते कोपर रस्त्यामधील अडथळा दूर
Nalasopara Unauthorized Building, Supreme Court,
पुरे झाली शोभा…
additional commissioner of pcmc on Fire At Unauthorized Scrap Shops
पिंपरी-चिंचवड: “अनधिकृत गोदामांवर नंतर बोलू आधी आग विझवू”, अतिरिक्त आयुक्तांची अनधिकृत गोदामांना बगल!
Traffic jam due to closure of road leading from Shaniwar Chowk towards Mandai Pune news
शनिवारची सुट्टी वाहतूक कोंडीत… कोठे घडला प्रकार?
readers feedback on loksatta editorial
लोकमानस :…तर राष्ट्रपती राजवट लावली असती
Traffic changes due to flyover work at Katraj Chowk Confusion among people due to having to take alternative route
कात्रज चौकाची ‘कोंडी’… वाहतुकीचा बोजवारा

हेही वाचा : चंद्रपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प येथे उभारण्यात येणार ताडोबा भवन

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे रस्त्यांची जागोजागी डागडूजी केली गेली. झाडा-झुडपांची तोड होत आहे. एवढेच नाही तर सुंदर शहर दाखवण्यासाठी दुभाजकावर चक्क ५ ते ७ फुटाची मोठी झाडे लावण्यात आली. त्रिमूर्ती चौक ते मुस्लीम लायब्ररी चौक तसेच शास्त्री चौकातील दुभाजकांवर अशा मोठ्या झाडांचे वृक्षारोपण झाल्याने शहरात हा चर्चेचा विषय ठरला आहे. इतकेच काय, रस्त्यांची सफाई होऊन शहर स्वच्छ असल्याचा ‘कांगावा’ स्थानिक लोकप्रतिनिधींची यंत्रणा करताना दिसत आहेत.

Story img Loader