आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एसआरए-अ‍ॅक्सिस बँक प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांच्यावर मानहानीचा दावा करणारी नोटीस आज बजावली आहे. झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतील घरभाडय़ाची रक्कम अ‍ॅक्सिस बँकेच्या वरळी शाखेत जमा करण्याचे आदेश झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने काढल्याच्या मुद्यावरून ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर गैरव्यवहाराचा आरोप केला होता.

फडणवीस यांनी एसआरए-अ‍ॅक्सिस बँक प्रकरणात ठाकरे यांनी केलेले आरोप आधारहीन असल्याचे सांगत अ‍ॅड. गणेश सोवानी यांच्यामार्फत मानहानीची नोटीस बजावली आहे. मुख्यमंत्र्यांकडून याप्रकरणात एवढय़ा तातडीने प्रतिसाद मिळणे यातून त्यांची अस्वस्थ लपून राहिलेली नाही. नोटीस मिळाल्यावर त्याला योग्य उत्तर दिले जाईल, असे माणिकराव ठाकरे म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm gave notice to manikrao thakre