नागपूर: महानिर्मितीने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच्या कामाला गती दिली आहे. या योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज येथील प्रकल्प कार्यान्वीत झाला असून तेथील १५०० शेतकऱ्यांना लाभ होत आहे. तर लवकरच सांगलीतील दोन सौर प्रकल्पही लवकरच कार्यान्वित होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत वीज पुरवठ्यासाठी शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली. त्यानुसार महानिर्मितीने ४.४ मेगावॅटचा कुंभोज, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर येथील सौर ऊर्जा प्रकल्प ५ ऑगस्ट २०२३ रोजी कार्यान्वित केला. या प्रकल्पाची स्थापित क्षमता ४.४ मेगावॅट आहे. या प्रकल्पामुळे कुंभोज आणि हिंगणगाव या दोन गावांतील १५०० कृषी वीज ग्राहकांना सौर ऊर्जेचा लाभ मिळेल.

हेही वाचा – हिमालयीन गिधाडाचे यशस्वी कृत्रिम प्रजनन; भारतातील पहिला प्रयोग

हेही वाचा – गोंदियातील भात रोवणी अंतिम टप्प्यात; ८६.४७ टक्के क्षेत्रात पेरणी

शासनाच्या ९ हेक्टर शासकीय पडीक जमिनीवर उभारलेला हा प्रकल्प महावितरणच्या ३३/११ के. व्ही. कुंभोज उपकेंद्राला जोडण्यात आला आहे. त्याचा खर्च १८ कोटी आहे. महानिर्मिती, मेसर्स ई. ई. एस. एल. (विकासक), मेसर्स टाटा (सब व्हेंडर) यांच्या माध्यमातून हा प्रकल्प कार्यान्वित झाला. प्रकल्पामुळे महानिर्मितीची एकूण सौर ऊर्जा स्थापित क्षमता आता ३७६.०२ मेगावॅट झाली आहे. या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर ४० व्यक्तींना रोजगार मिळेल. सौर ऊर्जेद्वारे वीजेसाठी ३.३० रुपये प्रती युनिट दराने महावितरणसोबत वीज खरेदी करारही झाला आहे. महानिर्मितीचे बोर्गी (जिल्हा-सांगली) २ मेगावॅट, दरीकोन्नूर ६.१६ मेगावॅट (तालुका जत जिल्हा सांगली) येथील सौर ऊर्जा प्रकल्पाची कामे अंतिम टप्प्यात असून तेही लवकरच कार्यान्वित होणार असल्याचे महानिर्मितीचे म्हणणे आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm solar agriculture channel project in kolhapur launched see how many farmers benefited mnb 82 ssb
Show comments