लोकसत्ता टीम

अकोला: जिल्ह्यातील तीन कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर सहकार गटाने आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, ठाकरे गटासह भाजपने एकत्र येत अकोला, अकोट व बार्शीटाकळी बाजार समित्यांवर विजय मिळवला. अकोला बाजार समितीतील सर्व १८ जागा जिंकत सहकार गटाने आपला दबदबा कायम ठेवला. या बाजार समितीवर धोत्रे गटाची तब्बल ४० वर्षांपासून सत्ता आहे. अकोट, बार्शीटाकळीत आ.मिटकरींना धक्का बसला आहे.

Demand money from company owner in name of MLA Pune news
आमदाराच्या नावाने कंपनी मालकाकडे पैशांची मागणी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
shiv sena shinde group claim 73 thousand duplicate voters in navi mumbai
गावाकडच्या दुबार मतदारांमुळे नवी मुंबईत खळबळ
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
dcm devendra fadnavis criticized congress mla ravindra dhangekar
‘कसब्या’तील आमदारांची कामे कमी आणि दंगा जास्त; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका
investors of DSK, Maval-Mulshi sub-divisional magistrate, Court, DSK,
‘डीएसके’ यांच्या गुंतवणूकदारांची यादी सादर करण्याचे मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त

अकोला बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि भाजपने एकत्र येत सहकार पॅनल म्हणून निवडणूक लढवली. या निवडणुकीत वंचित आघाडी रिंगणात उतरली होती. शेतकरी शिव पॅनल सहकार पॅनलच्या विरोधात होते.

मात्र, यात वंचितच्या पॅनलचा धुव्वा उडाला. काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि भाजपच्या सहकार पॅनलने सर्वच्या सर्व १८ जागांवर विजय मिळवला आहे. यामध्ये राष्ट्रवादीने सर्वाधिक नऊ जागा जिंकल्या, तर भाजप पाच, काँग्रेस व ठाकरे गटाला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या. शिरीष धोत्रे, विकास पागृत, दिनकर वाघ, वैभव माहोरे, संजय गावंडे, चंद्रशेखर खेडकर, राजीव शर्मा, दिनकर नागे, राजेश बेले, भरत काळमेघ, ज्ञानेश्वर महल्ले, अभिमन्यू वक्टे, सचिन वाकोडे, रामेश्वर वाघमारे, शालिनी चतरकर, माधुरी परनाटे, मुकेश मुरूमकार, हसन चौधरी हे विजयी झाले आहेत.राष्ट्रवादीकडे सभपतिपद जाणार आहे. राष्ट्रवादीचे शिरीष धोत्रे यांची पुन्हा एकदा सभापतिपदावर वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. उपसभापतीपद भाजपकडे जाईल.

आणखी वाचा- गडचिरोली: भाजप-राष्ट्रवादी युतीला अपक्ष गटाचा ‘दे धक्का’

अकोट बाजार समितीमध्ये चार पॅनलमध्ये लढत होती. सहकार पॅनल, शिवसेना ठाकरे गट व वंचित आघाडीचे युतीचे कास्तकार पॅनल, माजी आमदार संजय गावंडे यांच्या नेतृत्वातील शेतकरी पॅनल तर बाजार समितीचे माजी मुख्य प्रशासक गजानन पुंडकर यांचे जयकिसान पॅनल अशी चार पॅनल निवडणुकीच्या मैदानात होते. सहकार पॅनलने १८ पैकी १५ जागा जिंकत एकहाती सत्ता राखली. व्यापारी, अडते आणि हमाल मतदारसंघातून तीन अपक्षांना बाजी मारली आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि ठाकरे गटाचे माजी आमदार संजय गावंडेंच्या नेतृत्वाखालील पॅनलचा सुपडासाफ झाला. ठाकरे गटाचे माजी आमदार संजय गावंडे यांचा सोसायटी मतदारसंघातून सहकार गटाचे गजानन डाफे यांनी पराभव केला. माजी सभापती गजानन पुंडकर यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. अकोट बाजार समितीमध्ये शंकरराव लोखंडे, अविनाश जायले, रमेश वानखडे, अंजली सोनोने, अरूणा अतकड, कुलदीप वसू, गोपाल सपकाळ, सुनिल गावंडे, रितेश अग्रवाल, अजमल खा आसिफ खा, प्रमोद खंडारे, श्याम तरोळे, गजानन डाफे, विजय रहाणे, बाबुराव इंगळे, धिरज हिंगणकर, प्रशांत पाचडे, अतुल खोटरे हे १८ जण विजयी झाले.

आणखी वाचा- बुलढाणा: रात्रभर पाऊस; पाच बाजार समित्यांसाठी आज मतदान

बार्शीटाकळीमध्ये सहकार गटाने आपली सत्ता अबाधित ठेवली. काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि भाजपच्या सहकार पॅनलने १८ पैकी १५ जागांवर विजय मिळवला. वंचित आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या पॅनला केवळ तीन जागा मिळाल्या. बार्शिटाकळीत बाजार समितीमध्ये मंगला गोळे, गंगाबाई सोनटक्के, महादेव काकड, अशोक राठोड, अशोक कोहर, कल्पना जाधव, गोपाळराव कटाळे, शेख अजहर शेख जमीर, रमेश बेटकर, अशोक इंगळे, सुरेश शेंडे, अनिलकुमार राऊत, गोवर्धन सोनटक्के, प्रभाकर खांबलकर, महादेव साबे, रूपराव ठाकरे, वैभव केदार, सतीश गावंडे हे १८ जण विजयी झाले.