नागपूर : विदर्भात २,३३६ ग्रामपंचायतींमध्ये १८ डिसेंबर रोजी सदस्य व सरपंचपदासाठी निवडणूक होणार असून त्यासाठी बुधवारपासून आजारसंहिता लागू करण्यात आल्याचे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> नागपूर : कर्जाचा डोंगर, धान्यविक्रेत्याची विष प्राशन करत केली आत्महत्या

आयोगाने बुधवारी राज्यातील विविध जिल्ह्यांतील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार असल्याचे सांगितले. त्यात विदर्भातील २३३६ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या सर्व गावांमध्ये बुधवारपासून आचारसंहिता लागू झाली आहे. विदर्भात होणाऱ्या निवडणुकांमध्ये पश्चिम विदर्भातील अकोला (२६६), अमरावती (२५७), बुलडाणा (२७९), वाशीम (२८७), यवतमाळ (१००) या जिल्ह्यातील एकूण ११८९ तर पूर्व विदर्भातील नागपूर (२३७), भंडारा (३६३), चंद्रपूर (५९), गडचिरोली (२७), गोंदिया (३४८), वर्धा (११३) या जिल्ह्यातील ११४७ ग्रामंपंचायतींचा समावेश आहे.

मंत्र्यांचे दौरे नाही, घोषणाही करता येणार नाही

निवडणूक आचारसंहितेमुळे या गावांमध्ये मंत्र्यांना दौरे करता येणार नाही तसेच नवीन विकास कामांच्या घोषणाही करता येणार नाही. या निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामीण भागातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापणार आहे.