नागपूर : कडाक्याच्या थंडीत नागपुरातील पोलीस भरतीमध्ये मैदानावर शेकडो युवक दाखल झाले आहेत. मात्र, एवढ्या थंडीत पहाटे ६ वाजतापासून युवक मैदानात उपस्थित आहेत. पोलीस भरतीसाठी पहाटेपासून रांगेत बसावे लागत आहे. राज्यभरातील ३४ हजार उमेदवारांनी पोलीस शिपाई भरती अर्ज भरले आहेत. राज्यतील प्रत्येक जिल्ह्यातून युवक बोलणे दाखल झाले आहेत. नागपूर आयुक्तालयाकडून भरतीसाठी आलेल्या युवकांना राहण्यासाठी निवाऱ्याची सोय केली नाही. त्यामुळे अनेक तरुण कडक्याच्या थंडीत पोलीस मैदान, रेल्वे स्थानक, बस स्थानक आणि फुटपाथ वर रात्र काढत आहेत. या मुलांसाठी नागपुरातील एकही संघटना, संस्था किंवा समाजिक कार्यकर्ता मदतीस धावून आला नाही. अनेक मुळे उपाशी झोपून पहाटेच मैदानावर भरती साठी उपस्थित राहत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा