नागपूर : विदर्भात दरवर्षी हिवाळ्यात डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांतच गारठा अधिक असतो. यावर्षीदेखील विदर्भात नोव्हेंबरनंतरच किमान तापमानाचा पारा दहा अंशाच्या खाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वैदर्भीयांना कडाक्याच्या थंडीसाठी डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या आठवडाभरापासून राज्यभरातच वातावरणात पूर्णपणे बदल झाला आहे. विदर्भातदेखील पहाटे आणि रात्रीच्या सुमारास हवेत गारठा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. तर दिवसा मात्र अजूनही उन्हाचे चटके जाणवत आहेत. शहरातील प्रादेशिक हवामान खात्याच्या अंदाजानुसार नोव्हेंबर महिन्यात गुलाबी थंडी राहणार असून उत्तरार्धात थंडीचा जोर वाढणार आहे. नोव्हेंबर महिन्यात राज्यभरातच थंडीचा जोर कमी राहणार असल्याचा अंदाज पाच दिवसांपूर्वी भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला होता. विदर्भातदेखील हीच परिस्थिती कायम असणार आहे.

हेही वाचा – सरकारच्या गलथानपणामळे ५० ओबीसी विद्यार्थी अडचणीत – वडेट्टीवार

हेही वाचा – केंद्रीय माध्यमिक शिक्षक पात्रता परीक्षेची तारीख जाहीर

‘एल निनो’ मुळे यंदा थंडीचा जोर कमी असणार आहे. हा संपूर्ण महिनाच हिवाळा सामान्य असणार आहे. त्यामुळे दिवाळीत कडाक्याची नाही तर गुलाबी थंडी अपेक्षित आहे. त्यानंतर मात्र थंडीचा जोर वाढेल, असा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याने व्यक्त केला आहे. १५ डिसेंबरनंतर गारठ्यात वाढ होईल आणि किमान तापमानाचा पारा दहा अंशापेक्षाही खाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी होणाऱ्या शेकोट्यांच्या दर्शनासाठी वाटच पाहावी लागणार आहे. तरीही शहरातील गरम कपड्यांच्या दुकानांमध्ये मात्र हळूहळू ग्राहकांची गर्दी सुरू झाली आहे. तर १५ जानेवारीपर्यंत अधूनमधून थंडीच्या लाटा येतच राहील. मात्र, पाच वर्षांपूर्वी २९ डिसेंबर २०१८ ला शहरातील किमान तापमान ३.५ अंश सेल्सिअसवर गेले होते. यंदा किमान तापमानाची ही पातळी गाठण्याची शक्यता कमीच आहे. नागपूर तसेच विदर्भात आजपर्यंत अनेकदा किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी राहिला आहे. यावेळीही तो कमीच राहील, पण पाच वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत निघण्याची शक्यता नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cold weather in vidarbha in december and january what is the forecast of the regional meteorological department rgc 76 ssb