लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अकोला : विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होत असून शेवटच्या ४८ तासासाठी विविध निर्बंध लागू केले आहेत. वाहनांमधून केंद्रावर मतदारांची एकत्रित ने-आण करणे देखील गुन्हा ठरणार आहे. निवडणूक प्रचारतोफा १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता थंडावणार असल्या तरी घरोघरी प्रचारावर निर्बंध राहणार नाहीत. मात्र, पाचहून अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.

राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींकडून मतदारांची केंद्रावर ने-आण केली जाते. मात्र, आता केंद्रावर मतदारांना ने-आण करण्यासाठी वाहन वापरणे हा गुन्हा ठरणार आहे. त्यास पायबंद घालण्यासाठी टॅक्सी, कार, ट्रक, रिक्षा, मिनीबस, व्हॅन, स्कूटर आदींना बंदी घालण्यात आली आहे. मतदानापूर्वीच्या ४८ तासांत बेकायदेशीर जमाव एकत्र गोळा करण्यास व सार्वजनिक प्रचार सभा आयोजनास बंदी राहील. मतदान पथके केंद्रावर पोहोचल्यावर २०० मीटर परिसरात ध्वनीक्षेपकाच्या वापरावर पूर्णपणे निर्बंध राहतील.

आणखी वाचा- तीन दिवसांची सुट्टी! मतदानावर काय परिणाम…

राजकीय पक्ष व उमेदवारांना मतदार अनुक्रमांक, केंद्र आदी अनौपचारिक ओळख चिठ्ठ्या केवळ पांढऱ्या कागदावर देता येतील. त्यावर उमेदवाराचे नाव व निवडणूक चिन्ह नसण्यासह मतदान केंद्रापासून २०० मीटरच्या आत चिठ्ठी वाटप करता येणार नाही. निवडणूक कर्तव्यावरील वाहनांशिवाय इतर सर्व वाहनांवर बंदी राहील. केंद्रात मतदार, उमेदवार व त्यांचे निवडणूक मतदान प्रतिनिधी याव्यतिरिक्त केवळ निवडणूक आयोगाचे प्राधिकारपत्र मिळविलेल्या व्यक्तींनाच प्रवेश राहील. इतरांना प्रवेशावर बंदी आहे. मतदारांना लाच देणे, गैरवाजवी दडपण, मतदारांना धाक दाखवणे, तोतयेगिरी करणे, तसेच मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात प्रचार करण्यास बंदी राहील.

मतदान केंद्राच्या परिसरात पत्रके, ध्वज, चिन्हे, प्रचार साहित्याचे प्रदर्शन करता येणार नाही. सरकारी किंवा खासगी सुरक्षारक्षक असलेल्या व्यक्तीला निवडणूक प्रतिनिधी किंवा मतदान प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यास बंदी आहे. मतदान केंद्राध्यक्ष, आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था पथकप्रमुख, निवडणूक सुरक्षा कर्मचारी वगळता इतरांना मोबाइल, स्मार्टफोन, वायरलेस सेट मतदान केंद्रात नेण्यास निर्बंध केले.

आणखी वाचा-“सुनील केदार हे मारुतीच्या बेंबीतला विंचू”, शिवसेना नेते भास्कर जाधव यांची जहरी टीका

या वाहनांना सूट

रुग्णालयाची वाहने, रूग्णवाहिका, दुधगाड्या, पाणीपुरवठा वाहने, अग्निशमन बंब, पोलीस, वीज, निवडणूक कर्मचाऱ्यांच्या वाहने, विहित मार्गाने जाणाऱ्या बसगाड्यांवर बंदी नाही. दिव्यांग, आजारी व्यक्तीस मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी वैयक्तिक वाहनास किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिव्यांगांसाठी नेमून दिलेल्या वाहनास बंदी राहणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.