नागपूर: महानिर्मितीच्या कोराडीतील प्रस्तावित विद्युत प्रकल्पावर सुनावणी सुरू असताना जिल्हाधिकारी बाटली बंद पित होते. त्याचवेळी उपस्थितांपैकी एकाने ‘अहो जिल्हाधिकारी साहेब बाटली बंद पाण्याऐवजी जरा कोराडीतील विहिरीचे, नळाचे पाणी पिऊन बघ, पाण्यातील प्रदुषण कळेल असे सांगत सर्वांचे लक्ष वेधले. महाविदर्भ जनजागरणचे नितीन रोंघे यांनी या सुनावणीत भाग घेऊन प्रस्तावित प्रकल्पामुळे होणा-या प्रदुषण आकडे लक्ष वेधले.
कोराडीतील ६६० मेगावॅटच्या दोन संच अशा एकूण १,३२० मेगावॅटच्या नवीन प्रकल्पाबाबत ही सोमवारी सुनावणी झाली. नितीन रोंघे पुढे म्हणाले, नागपूर जिल्ह्यात आधीच तापमाण जास्त आहे. कोराडीतील विद्युत प्रकल्पामुळे येथील तापमाण १ ते २ अंश सेल्सिअसने नेहमीच जास्तच असते. त्याचा महिलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. विद्युत प्रकल्पामुळे परिसरातील तलाव, नदी, नाले प्रदुषीत झाले आहे. सर्वत्र राखेचे अंश दिसतात. आपण बाटलीबंद पाणी पित आहोत.
हेही वाचा >>> नागपूर : कर्जबाजारी युवा व्यावसायिकाची आत्महत्या
आपल्याला प्रदुषणाची दाहकता बघायची असल्यास येथील नळ, विहरीतले पाणी आपण पिण्याची गरज आहे. त्यातून येथील प्रदुषणाचा अंदाज आपल्या लक्षात येईल, असेही रोंघे म्हणाले. त्यांनी कोराडीतच नव्हे तर विदर्भात नवीन औष्णिक विद्युत प्रकल्प नको, अशी भूमिका मांडली. सोबत नवीन प्रकल्पाची गरज असल्यास तो पुण्यात करण्याची मागमी करत पुण्यात मोठ्या प्रमाणात सांडपाणी उपलब्ध असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना जनसुनावणीत दिले.