सार्वजनिक ठिकाणी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यासारखे जिल्ह्याचे सर्वाेच्च अधिकारी कॅरमचा डाव मांडून खेळात रमल्याचे चित्र धक्कादायीच म्हणावे लागेल. यांनी तर मजा घेतलीच पण प्रेक्षकांनीही भरभरून दाद दिली.निमित्त होते खासदार महोत्सवाचे. खासदार रामदास तडस यांनी पुढाकार घेवून विविध सोळा प्रकारांचा क्रीडा महोत्सव आयोजित केला आहे. त्यात जिल्ह्यातील बहुतांश मान्यवरांची हजेरी लागली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक नुरूल हसन, जिल्हा परिषदेची मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व अन्य प्रथमश्रेणी अधिकारीही हजर झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>>नागरिकांना उन्हाळ्यात पाणी कपातीचे चटके, अकोला महापालिकेचा निर्णय

नेमकी कॅरम स्पर्धा सुरू होण्यावेळी मान्यवर आल्यानंतर यांच्याच सहभागासह स्पर्धेला प्रारंभ करण्याची सूचना खासदारांनी केली. कॅरम बोर्ड व सोंगट्या होत्याच कर्डिले, हसन व घुगे या तिघांना भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी सोबत दिली. पंधरा मिनिटे खेळ रंगला. त्यात पाेलीस अधीक्षक नुरूल हसन यांची चुणूक दिसून आली. कॅरमचा स्ट्रायकर शिताफीने मारण्याची त्यांची शैली अनेकांना भावली. या वरिष्ठांच्या खेळाने उपस्थितांनाही आनंद दिला.