चंद्रपूर: प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि पेपरलेस होण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून जिल्हाधिकारी कार्यालय आता संपूर्णपणे ‘ऑनलाईन’ झाले आहे. ई-ऑफिस प्रणालीच्या माध्यमातून आतापर्यंत १२ हजार ८४६ फाईल्स निकाली काढण्यात आल्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी सांगितले.

शासकीय कामकाज करतांना विविध विभागाच्या फाईल्स अनेक दिवस प्रलंबित असतात. वेळेवर फाईल्सचा निपटारा होत नसल्याने अनेक विकास कामांना विलंब होतो. तसेच प्रशासनावर नागरिकांचाही रोष वाढतो. यावर मात करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री यांनी १ एप्रिल २०२३ पासून राज्यभरातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ‘ई-ऑफिस’ प्रणाली सुरु करण्याचा निर्णय घेतला.

dharmarajya party agitation against evm in thane
ईव्हीएम यंत्राविरोधात धर्मराज्य पक्षाकडून आंदोलनाला सुरूवात; शहरातील चौका-चौकात ईव्हीएम हटविण्यासाठी मतदान
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
kdmc steps to cut off water connection and electricity supply to 58 illegal buildings in dombivli
डोंबिवलीतील ५८ बेकायदा इमारतींमधील पाणी, वीजपुरवठा खंडित करण्याच्या हालचाली, उच्च न्यायालयाच्या आदेशावरून कारवाईचे नियोजन
pune pmc On first day of Sarvankash Swachhta 24 tons of garbage and billboards removed
महापालिका आयुक्तांचा आदेश आणि पहिल्याच दिवशी झाले इतके काम ! महापालिकेची सर्वंकष स्वच्छता मोहीम, १६ टन राडारोडा, २४ टन कचराही उचलला
Devendra Fadnavis returns as Chief Minister and visits his hometown for first time at 3 pm Thursday
मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला १०० दिवसांचे लक्ष्य
Increase in water supply to Thane Bhiwandi Mira Bhainder
दिड वर्षात ठाणे, भिवंडी, मीरा-भाईंदरला वाढीव पाणी; स्टेम प्राधिकरणाकडून पाणी उचल क्षमता वाढविण्याच्या कामास सुरूवात
land records department will provide online property title change notices to postal department
मालमत्तेसबंधीत टपाल विभागाला ऑनलाईन नोटीस… काय होणार परिणाम ?
Devendra Fadnavis Mahayuti
Devendra Fadnavis : महायुतीत मंत्रिपदाचं समीकरण काय? तीन पक्षांमध्ये कोणाला मिळणार संधी? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं!

हेही वाचा… वाशीम : कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेले प्राथमिक आरोग्य केंद्र धूळखात, आदिवासी बहुल गावातील नागरिकांना घ्यावा लागतो शहरात उपचार

यावर अंमलबजावणी करीत जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील २५ शासकीय कार्यालये तसेच जिल्ह्यातील सर्व ८ उपविभागीय अधिकारी कार्यालयांमध्ये ई-ऑफिस प्रणाली राबविण्यात येत आहे. जून महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्यातील १५ तहसील कार्यालयांमध्ये ही प्रणाली सुरू होणार असल्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी सांगितले.

हेही वाचा… जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेची मुदत जाहीर

सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ई-ऑफिस प्रणालीचा वापर सुरू केल्यास कामकाजाला गती येईल. शिवाय कामकाज संपूर्णपणे कागद विरहित (पेपरलेस) होणार असल्याने प्रशासनाच्या कामकाजात अधिक सुलभता येणार आहे. विशेष म्हणजे या प्रणालीच्या माध्यमातून मोबाईलवर देखील कामकाजाच्या फाईल्स, कागदपत्रे पाहता येणार आहे. ई-सेवा निर्देशांकात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आणण्यासाठी जास्तीत-जास्त सेवांची संख्या वाढविण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत.

Story img Loader