लोकसत्ता टीम

नागपूर: भंडारा जिल्ह्यातील जवाहर नगर आयुध निर्माणीतील स्फोटात कारखान्यात प्रशिक्षणार्थी म्हणून काम करणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास हा स्फोट झाला. कारखान्यातील मलब्याखाली अनेक कामगार दबले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. यात एका प्रशिक्षणार्थी कामगाराचा मृतदेह सापडला आहे. अंकित बारई , वय २२, साहुली असे त्याचे नाव असून तो आर्ट अँड कॉमर्स महाविद्यालय ठाणा येथील बी.कॉम. द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे.

घटनास्थळी बचाव पथकाचे काम युद्धस्तरावर सुरू आहे.आधी घटनास्थळी दोन जेसीबी होत्या आता आणखी दोन अशा ४ जेसीबी मलबा काढण्याचे काम करत आहे. जिल्ह्यातून १०२ रुग्णवाहिका जवळपास १५ ते २० पाचारण करण्यात आल्या आहेत. अधिकृतपणे या अपघातात किती कामगार दगावले हे जाहीर करण्यात आले नाही. मात्र जीवितहानी मोठी असल्याची चर्चा आहे.

Story img Loader