चंद्रपूर: २०२४ मध्ये अवकाशातील खगोल घटना अतिशय सुंदर व मनमोहक राहणार आहेत. नवीन वर्षात गूढ असणारे धुमकेतू आणि उल्का वर्षाव, सुंदर ग्रह दर्शन आणि युती-प्रतियुती, पिधान, पौर्णिमा, ब्लू मून, सुपरमून आणि सूर्य आणि चंद्र ग्रहणे पहावयास मिळणार आहे.

२०२४ मध्ये जवळ जवळ १० धुमकेतू सूर्याच्या जवळ येत असले तरी त्यापैकी ५ धुमकेतू पृथ्वीच्या थोडे जवळ येतील तेव्हा साध्या दुर्बिणीने किंवा द्विनेत्रीने बघण्याची संधी आहे. यातील २ धुमकेतू साध्या डोळ्याने दिसण्याची शक्यता आहे. सूर्य आणि चंद्र ग्रहण हे अवकाशातील सर्वाधिक सुंदर आणि कुतूहलाच्या घटना आहेत. परंतु, पुढील वर्षी भारतातून केवळ एक खंडग्रास ग्रहण दिसेल आणि तेही केवळ पश्चिम भारतातूनच दिसेल. त्यामुळे ग्रहणानी आपली निराशा केली आहे. १७-१८ सप्टेंबर २०२४ चे खंडग्रास चंद्रग्रहण हे केवळ पाश्चिम भारतातून दिसणार आहे.

Surya-Shukra Yuti 2025
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; सूर्य-शुक्राची युती नव्या वर्षात करणार मालामाल
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Mangal Margi 2025
२०२५ मध्ये मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार भाग्याची साथ
Shani Nakshatra Gochar
Shani Nakshatra Gochar 2024 : दोन दिवसानंतर शनि देव करणार नक्षत्र परिवर्तन; या तीन राशींचा सुरू होणार राजयोग, अपार पैसा-संपत्ती मिळणार
Chandra Gochar 2024
उद्यापासून सुरू होणार सुवर्ण काळ; चंद्राचे राशी परिवर्तन ‘या’ तीन राशींना देणार पैसा, प्रेम आणि भरपूर यश
Astrology Predictions Number 1 in Marathi
Astrology Predictions Number 1: मूलांक १ चे कसे असेल नवे वर्ष? धनलाभ, प्रेमात अडचणी, तर यंदा ‘या’ महिन्यानंतर सुरू होतील अच्छे दिन
India 2025 astrology predictions in Marathi
India 2025 Astrology Predictions: सोन्या-चांदीचा वाढत राहणार भाव; भारतासाठी २०२५ हे वर्ष कसे असणार? वाचा ज्योतिषाचार्य उल्हास गुप्तेंचा अंदाज
Mangal Gochar 2025
२०२५ मध्ये मंगळ सात वेळा बदलणार राशी, ‘या’ दोन प्रिय राशींना होणार अपार धनलाभ

हेही वाचा – बुलढाणा : उपोषणकर्त्यांची चौथ्या दिवशी प्रकृती खालावली; जिल्हाध्यक्षांना रक्तदाबाचा त्रास, विदर्भवाद्यांचे आंदोलन दुर्लक्षित

उल्का वर्षाव अवकाशातील गूढ आणि कुतूहलाच्या खगोलीय घटना असतात. हा दरवर्षी घडणारा उल्का वर्षाव कमी अधिक प्रमाणात दिसणार आहे. निरभ्र रात्री चंद्र आणि ग्रहांची युती या नियमित दिसणार्‍या घटना आहेत. मात्र, अगदी जवळून घडणार्‍या युती मात्र दुर्लभ असतात. बहुतेक युती या चंद्रासोबत दिसतात. प्रतियुती मात्र बाह्य ग्रहांच्या बाबतीत घडतात. त्यात तेजस्वी दिसणार्‍या गुरु आणि शनी ग्रहाचीच युती मनोहारी असणार आहे.

पृथ्वीच्या सूर्याभोवती, स्वताभोवती फिरण्यामुळे तसेच ग्रहांच्या फिरण्यामुळे ग्रहांच्या वेळा वर्षभर प्रत्येक महिन्यात बदलत असतात. त्यासाठी निरीक्षकांचे सातत्याने निरीक्षण असेल तर सहज ग्रहांच्या वेळा कळतात. पौर्णिमा दर महिन्याला घडणार्‍या घटना असल्या तरी प्रत्येक पौर्णिमा ही सारखी नसते. कधी चंद्र लहान तर कधी तो खूप मोठा दिसतो. ब्लू मूनला चंद्र निळा दिसत नसून एकाच महिन्यांतील दुसऱ्या पौर्णिमेला ब्लू मून म्हणतात. सुपरमून हा पृथ्वीच्या जवळ असणाऱ्या आणि मोठा चंद्र दिसणार्‍या पौर्णिमेला म्हणतात. या सर्व घटना वैज्ञानिक दृष्ट्या महत्त्वाच्या आणि मनोहारी असतात.

हेही वाचा – सुनील केदार कारागृहातच राहणार, सत्र न्यायालयाने फेटाळला जामीन

२५ जानेवारीला लघु चंद्र पौर्णिमा, २४ फेब्रुवारीला लघु चंद्र पौर्णिमा, २५ मार्चला लघु चंद्र पौर्णिमा, २३ एप्रिलला पौर्णिमा, १९ ऑगस्टला सुपरब्लू मून, १७ ऑक्टोबर – सुपर मून दिसणार आहे. भारताची जगप्रसिद्ध खगोल संस्था इस्रो ही तिच्या विविध उपग्रहीय आणि ग्रहीय यशस्वी मोहिमेमुळे गाजत आहे. २०२४ मध्ये आदित्य एल १, इनसँट -३ डीएस, गगनयान १ चाचणी, निसार उपग्रह प्रक्षेपण, स्पाडेक्स उपग्रह, मंगळयान, शुक्रयान, एक्सपोसँट अवकाश वेधशाळा मोहिमा होणार आहेत. संपात दिवस म्हणजे ज्या दिवशी सूर्य २० मार्च आणि २२ सप्टेंबरला विषुववृत्तावर येतो तो दिवस या दिवशी थोड्या फार फरकाने दिवस- रात्र समान असते. अयनदिन २१ जून आणि २२ डिसेंबर या दिवशी येतात. उत्तरायण संपते तेव्हा उत्तर गोलार्धात दिवस मोठा आणि रात्र लहान तर दक्षिणायन संपते तेव्हा दिवस लहान आणि रात्र मोठी असते. ३ जानेवारीला पृथ्वी सूर्याजवळ, २० मार्चला संपात दिन, ९ मेला बुध क्षितिजावर सर्वाधिक वर, २१ जूनला- अयन दिन, २२ सप्टेबरला संपात दिन, २१ डिसेंबरला अयन दिन असणार असल्याचे स्काय वाच ग्रुपचे अध्यक्ष खगोल अभ्यासक सुरेश चोपणे यांनी सांगितले.

Story img Loader