५ हजार ४८६ यंत्रांची प्राथमिक तपासणी
लोकसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागपूर आणि रामटेक मतदारसंघात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रासोबतच ‘व्हीव्हीपॅट’ या नवीन यंत्राचा वापर होणार आहे. बंगळुरू येथील भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड या नवरत्न कंपनीद्वारे ५ हजार ४८६ ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रे प्राप्त झाली आहेत. या यंत्राची प्राथमिक तपासणी सुरूअसून राजकीय पक्षांच्या प्राधिकृत प्रतिनिधींनी उपस्थित राहून त्याबद्दल माहिती करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुद्गल यांनी केले आहे.
‘व्हीव्हीपॅट’सह मतदान यंत्राची प्रथमस्तरीय तपासणी कळमना मार्केट येथील वेअर हाऊ सिंग गोडाऊ न विंग-सी येथे पोलीस सुरक्षेत कार्यालयीन वेळात सुरूआहे. यासाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जि’ातील रामटेक व नागपूर या दोन लोकसभा मतदारसंघात ४ हजार ३८२ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून या सर्व मतदारसंघावर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे मतदान घेतले जाणार आहे. यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून ४ हजार ३३६ बॅलेट युनिट, ५ हजार ४८६ कंट्रोल युनिट व ५ हजार ४८६ ‘व्हीव्हीपॅट’ ही नवीन यंत्रे मिळाली आहेत. ही यंत्रे केंद्र शासनाच्या संरक्षण मंत्रालयाच्या अधीन असलेल्या भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड या कंपनीद्वारे उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी दिली. प्राथमिक तपासणी दरम्यान योग्य आढळून आलेली मतदान यंत्रेच निवडणुकीसाठी वापरण्यात येतील. तसेच नादुरुस्त परत पाठवण्यात येतील, असेही जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी यावेळी स्पष्ट केले.
‘व्हीव्हीपॅट’ म्हणजे काय?
लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्य़ात बॅलेट आणि कंट्रोल युनिटसह प्रथमच व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल) चा वापर करण्यात येणार आहे. ‘व्हीव्हीपॅट’ हे प्रिंटरप्रमाणे काम करणार असून मतदानाच्यावेळी मतदान कक्षामध्ये बॅलेट युनिटसोबत ‘व्हीव्हीपॅट’ जोडलेले राहील. मतदानाच्यावेळी मतदार जेव्हा मतदान करतील तेव्हा ‘व्हीव्हीपॅट’च्या स्Rीनमध्ये सात सेकंदापर्यंत एक पेपरस्लीप डिस्प्ले होईल. त्यानंतर ती ‘व्हीव्हीपॅट’च्या ड्रॉपबॉक्समध्ये जमा होईल. मतदारांना ही स्लीप सोबत नेता येणार नाही. या स्लीपमध्ये उमेदवाराचा बॅलेट युनिटवरील अनुक्रमांक, नाव व निवडणूक चिन्ह मुद्रित असेल, अशाप्रकारे ‘व्हीव्हीपॅट’मुळे ज्या उमेदवाराला मत दिले आहे, त्याच उमेदवाराला मत पडले आहे याची खात्री मतदाराला करता येणार आहे.