नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) २५ ऑगस्टची राज्यसेवा पूर्व परीक्षा चौथ्यांदा रद्द केली. राज्यसेवा परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या २ लाख २५ हजार उमेदवारांमध्ये जवळपास ५ हजारांवर उमेदवार हे ‘आयबीपीएस’ची परीक्षा देणारे असतात तर कृषी सेवा परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेण्याचे दोन दिवसांआधीच आयोगाने जाहीर केले होते. असे असतानाही काही हजारांसाठी लाखो उमेदवारांना वेठीस धरल्याने संताप व्यक्त केला जात होता. आता नेमकी ही परीक्षा कधी होणार, हा गंभीर प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला असून यासंदर्भात महत्त्वाची माहिती एमपीएससीकडून जाहीर करण्यात आली आहे. आयोगाने २३ सप्टेंबरला बैठकीचे आयोजन केले असून यावेळी परीक्षेची तारीख जाहीर केली जाणार आहे. मात्र, सूत्रांनी बैठकीपूर्वीच परीक्षा नेमकी कधी होणार याविषयीचे अपडेट दिले आहेत.

हेही वाचा >>> आमिर खान २१ सप्टेंबरला अकोल्यात, शेतकऱ्यांशी संवाद साधणार

MPSC Maharashtra  State Services Exam Date Update Nagpur
MPSC Update: ‘एमपीएससी’ राज्यसेवा परीक्षेच्या तारखेसंदर्भात मोठी अपडेट, बैठकीमध्ये निर्णय होताच…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
illegal weapons smuggling in border areas of Buldhana district and Madhya Pradesh
बुलढाणा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात शस्त्र तस्करी उघड
Big update regarding MPSC Prelims Exam
‘एमपीएससी’ पूर्व परीक्षेबाबत मोठी अपडेट… अखेर तारीख…
MPSC welfare examination update news
एमपीएससीच्या समाजकल्याण परीक्षेबाबत मोठी अपडेट; या तारखेपर्यंत हरकती….
Vijay Wadettiwar, Nagpur project, Gujarat,
नागपूरचा प्रकल्प गुजरातला जाणार हे वडेट्टीवार यांना कोणत्या सुत्रांनी सांगितले? उद्योगमंत्री उदय सामंत यांचा सवाल
Pooja Khedkar in delhi high court
Pooja Khedkar : “मी AIIMS मध्ये जाण्यास तयार”, बनावट अपंग प्रमाणपत्राच्या आरोपावरून पूजा खेडकर यांची दिल्ली उच्चन्यायालयात विनंती!

एमपीएससीने परीक्षा पुढे का ढकलली?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) २५ ऑगस्टला होणाऱ्या परीक्षेत कृषी विभागाच्या २५८ पदांचा समावेश करण्याची मागणी करत स्पर्धा परीक्षार्थींनी पुणे येथे ठिय्या आंदोलन केले. खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससीच्या अध्यक्षांना या बाबत सकरात्मक निर्णय घेण्याची विनंती केली. त्यानंतर आता २२ ऑगस्टला सकाळी दहा वाजता एमपीएससीची बैठक झाली. यात परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा >>> बुलढाणा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात शस्त्र तस्करी उघड

कृषी सेवा परीक्षेबाबत संभ्रम

कृषी सेवेतील २५८ पदांचा समावेश राज्यसेवा परीक्षेत करण्याची परीक्षार्थींची मागणी आहे. मात्र कृषी सेवा परीक्षा २०२४ साठीचे मागणीपत्र शासनाकडून प्राप्त झाले नसल्याने २५ ऑगस्टच्या परीक्षेत या पदांचा समावेश करणे शक्य नाही, असे पत्रक आयोगाने २० ऑगस्टलाच जाहीर केले होते. परीक्षा पुढे ढकलल्याने आयोगाकडे मागणीपत्र आल्यावर राज्यसेवा परीक्षेमध्ये कृषी सेवेतील २५८ पदांचा समावेश केला जाईल अशी शक्यता होती. मात्र, त्यांचे मागणीपत्र परत सरकारकडे पाठवण्यात आले आहे. त्यामुळे या पदांबाबत संभ्रम आहे.

सूत्रांनी सांगितली ही परीक्षेची तारीख

एमपीएससीची राज्यसेवा परीक्षेची संपूर्ण तयारी झाली आहे. सर्व प्रश्नपत्रिका केंद्रावर पोहचल्या असून त्यांना कधीही परीक्षा घेणे शक्य आहे. मात्र, असे असले तरी आगामी विधानसभेच्या निवडणुकांचा फटका परीक्षेला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय निवडणुकांदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे आता राज्यसेवा परीक्षा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. २३ सप्टेंबरला होणाऱ्या बैठकीमध्ये निवडणुकांच्या तारखांचा अंदाज घेऊनच परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येणार आहे.