लोकसत्ता टीम

नागपूर : नागपुरातील लहानापासून ते मोठ्या अशा एकून ३१७ गुन्हेगारांची आयुक्तालयाच्या मैदानात परेड घेण्यात आली. सर्व गुन्हेगारांशी आयुक्तांनी स्वत: संवाद साधला. त्यांना सुधरण्याची शेवटची संधी दिली. यानंतर एकाही गुन्हेगारांचा एखाद्या अ‌वैध कृत्य किंवा गुन्ह्यांशी संबंध आल्यास त्या गुन्हेगाराची खैर केली जाणार नाही, असा खणखणीत इशारा पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी दिला.

नाशिक शहरातील खड्डे दुरुस्तीची मनपा आयुक्तांकडून पाहणी
नाशिक शहरातील खड्डे दुरुस्तीची मनपा आयुक्तांकडून पाहणी
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
cyber crime, Courier Scam, cyber criminals,
सायबर गुन्हेगारांचा फसवणुकीचा नवा प्रकार.. काय आहे ‘कुरिअर स्कॅम’?
3 people suffered with severe eye damage due to lasers light in kolhapur
कोल्हापुरात लेझरमुळे तिघांच्या डोळ्यांना गंभीर इजा; नेत्रविकार तज्ज्ञांकडून बंदी घालण्याची माग
Pune Rural Superintendent, Sandeep Singh Gill,
ग्रामीण अधीक्षकपदी संदीपसिंग गिल; पंकज देशमुख यांची बृहन्मुंबई येथे उपायुक्त म्हणून नियुक्ती
Nashik compensation land, Farmers Action Committee Nashik,
नाशिक : जागेचा मोबदला न मिळाल्यास रस्त्यांवर नांगर – मनपा आयुक्तांना शेतकरी कृती समितीचा इशारा
Contract electricity workers strike warning risk of system collapse
कंत्राटी वीज कामगारांचा संपाचा इशारा, यंत्रणा कोलमडण्याचा धोका
ST Bus, eknath shinde and ST Bus,
ST Bus : एसटीची चाके पुन्हा थांबणार? मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक रद्द झाल्याने कर्मचारी…

शहरातील २००८ पासून ते आतापर्यंत गुन्हे अभिलेखावर असलेल्या प्रत्येक गुन्हेगाराला पोलीस आयुक्तांनी आयुक्तालयात हजर केले. आज दुपारी ३१७ गुन्हेगार आयुक्तालयाच्या परेडला हजर झाले. त्यांच्याशी आयुक्तांनी संवाद साधून सुधरण्याची संधी दिली. भविष्यातील कोणत्याही गुन्ह्यात ३१७ पैकी एकाही गुन्हेगाराचा संबंध किंवा सहभाग आढळल्यास त्याला चांगला धडा शिकवणार असल्याचा आक्रमक पवित्रा पोलीस आयुक्तांनी यावेळी घेतला. ‘लोकसत्ता’शी बोलताना डॉ. सिंगल म्हणाले की, शहरातील हवाला व्यवसाय आणि क्रिकेट बेटिंग अशा पांढरपेशा गुन्ह्याचे आणि गुन्हेगाराचा समूळ बिमोड करण्यात येईल. अवैध दारू विक्री, जुगार, मटका, ड्रग्स, गांजा आणि अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांना लक्ष्य करण्यात येईल. अशा गुह्यात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. अ‌वैध सावकारांची यादी तयार केल्या जाईल. अवैध वसूली करणाऱ्या सावकारांच्या विरोधात मोहिम सुरू करण्यात येईल. शहरात प्रतिबंधात्मक कारवाई वाढविण्यात येणार असून कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहचविणारे घटकांचा बिमोड करण्यात येईल, असेही आयुक्त डॉ. सिंगल म्हणाले.

आणखी वाचा-नागपूर : प्रेमविवाह केल्यानंतर आर्थिक अडचणी वाढल्या; खर्च भागवण्यासाठी प्रेमविराने तब्बल १११ दुचाकी चोरल्या

गुन्हेगारांची ‘डेटा बँक’ तयार

नागपुरातील प्रत्येक गुन्हेगारांची माहिती गोळा करण्यात आली आहे. गुन्हेगारांचे छायाचित्र, फिंगर प्रींट आणि कोणत्या गुन्ह्यांशी संबंध आहे, किती गुन्हे दाखल आहेत, अशी माहितीची ‘डेटा बँक’ पोलीस आयुक्तांनी तयार केली. ३१७ गुन्हेगारांचीही संपूर्ण माहिती पोलिसांना गोळा केली आहे. भविष्यात गुन्हा घडल्यानंतर सर्वप्रथम डेटा बँकेची तपासणी करून गुन्ह्याची उकल करण्यात येणार आहे.

वाहतूक सुरळित करू

शहरात नेहमी वाहतूक व्यवस्था बिघडल्याची ओरड असते. शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होत असते. मात्र, आता रस्ते, चौक, रस्त्याचे बांधकाम आणि गर्दी या सर्व बाबींचे निरीक्षण आणि अभ्यास करण्यात येईल. पोलीस आणि नागरिकांच्या समन्वयातून शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यात येईल. वाहतूक व्यवस्थित ठेवण्यासाठी सामान्य नागरिकांचीही पोलीस मदत घेणार असल्याचे आयुक्त डॉ. सिंगल म्हणाले.