नागपूर: श्रावण महिना सुरू झाला तरी पावसाने काही जोर पकडला नाही, पावसाने उसंत घेतल्याने त्याचे दुरागामी परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यभरातील जलसाठ्यात गत वर्षीच्या तुलनेत सरासरी २० टक्के घट झाली आहे. पावसाची स्थिती अशीच राहिली तर पुढच्या काळात गंभीर स्थिती उद्भवण्याचा धोका आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्याच्या जलसंपदा विभागाच्या २७ ऑगस्टच्या राज्यभरातील मोठ्या सिंचन प्रकल्पातील जलसाठ्याची स्थिती बघितली तर धरणाची पाण्याची पातळी झपाट्याने कमी होताना दिसत आहे. २७ ऑगस्टला राज्यातील मोठ्या धरणात ७०. २० टक्के पाणी होते. याच तारखेला मागच्या वर्षी (२७ ऑगस्ट २०२२) धरणात ९०. ९२ टक्के पाणी होते. म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणात २० टक्के पाणीसाठा कमी असल्याचे स्पष्ट होते.

हेही वाचा… रक्षाबंधन : जाणून घेऊया इतिहास, शास्त्र आणि महत्त्व

विदर्भात नागपूर विभागाच्या तुलनेत अमरावती विभागात स्थिती बिकट अस ल्याचे आकडे दर्शवतात. या विभागातील १० मोठ्या धरणात मागच्या वर्षी २७ ऑगस्टला ८८.५७ टक्के पाणी होते. यंदा याच तारखेला ६९.४४ टक्के म्हणजे १९ टक्के कमी पाणी आहे. नागपूर विभागातील १६ मोठ्या धरणात २७ ऑगस्ट २०२२ ला ८१.९९ टक्के पाणी होते, यंदा याच तारखेला ७७.३६ टक्के म्हणजे १२ टक्के कमी पाणी आहे. अशीच स्थिती औरंगाबाद ,नाशिक, पुणे आणि कोकण विभागाची आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Compared to last year water in water reservoirs in maharashtra is less cwb 76 dvr